अकाेला- मराठी साहित्य निर्मितीमध्ये भावभावनांचे प्रतिबिंब उमटताना दिसत आहे. लेखक, कवी बांधीलकी जपून ज्याप्रमाणे लिखाण करतात, त्याचप्रमाणे कलावंतही मनाेरंजनातून समाजप्रबाेधनाचा वसा चालवितात. जाे सर्वांची मनाेभूमिका जपताे, रसिकांचे मनाेरंजन करताे ताेच खरा कलावंत आहे, असे प्रतिपादन सिने अभिनेत्री रसिका धामणकर यांनी केले.
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदन हॉलमध्ये नुकतेच आयाेजित सहाव्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन साेहळ्यात त्या उदघाटीय भाषणात बाेलत हाेत्या. माेबाईलच्या युगात संवाद हरवत चालला आहे. वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी वृक्ष संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राजमाता पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त तरुणाई फाउंडेशन, कुटासातर्फे ज्येष्ठ कवी स्व. अरविंद भाेंडे साहित्य नगरीत आयाेजित या संमेलनाला अध्यक्षा प्रा. दीपाली साेसे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डाॅ. सतीश तराळ, हास्यजत्रा फेम कुणाल मेश्राम, डाॅ. संदीप चव्हाण, डाॅ. किरण वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. प्रास्ताविक आयाेजन समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख यांनी केले. स्वागताध्यक्ष कविता अमाेल मिटकरी यांच्या संदेशाचे वाचन तुळशिदास खिराेडकार यांनी केेल.
सद्यस्थितीत साहित्यिकांवर माेठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे देशाला नवी दिशा देणाऱ्या साहित्याची गरज आहे. बाेलीभाषेतून समाजाची वेदना मांडल्या गेली पाहिजे, असे प्रा. तराळ यांनी सांगितले. माेबाईलच्या विळख्यात अडकलेल्या युवकांनी भानावर येऊन देशहितासाठी पावले उचलली पाहिजेत, असे डाॅ. संदिप चव्हाण यांनी सांगितले. साहित्य संमेलने ही परिवर्तनाचा केंद्रबिंदू असून, ती गावागावात झाली पाहिजे, असे डाॅ. किरण वाघमारे यांनी सांगितले.
ग्रामीण चित्रण साहित्यातून उमटले पाहिजे- दीपाली साेसे
वाचनातूनच समृद्ध साहित्याची निर्मिती हाेते. त्यामुळे वाचनालय चळवळ गतिमान हाेणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. बालकांसाठी सकस साहित्य निर्मिती झाली पाहिजे. ग्रामीण जनमाणसाचे यर्थार्थ चित्रण साहित्यातून समाेर आले पाहिजे, अशी अपेक्षा संमेलनाध्यक्षा प्रा.दीपाली साेसे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. सूत्रसंचालन राहुल भगत यांनी केले. आभार प्रा. गणेश मेनकार यांनी मानले.
-----
यांना करण्यात आले स्वामी विवेकानंद युवा श्री पुरस्कारा ने सन्मानित
संमेलनात साेनल बांगड, मनिषा तायडे, अश्वीन कुलकर्णी, माेहन भटकर, रवींद्र मेठे, डाॅ. सुनील काळे, मीनल माहितकर, संताेष झामरे, आदेश महाजन, अभिजित देशमुख , गाेपाल पवार, संगीता जाधव, सुनीता पाटील, दिनेश झबीले दीपक माहितकर आदींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर लगेच गझल मुशायऱ्याला सुरुवात करण्यात आली गोपाल मापारी यांच्या सूत्रसंचालनाखाली तर अमोल शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली विशाल राजगुरू ऐ जाज शेख दिवाकर जोशी अविनाश येलकर आत्तम गेदे प्रियंका गिरी अश्विनी बोडे गिरीश जोशी प्रवीण हटकर आदींनी आपल्या बहारदार गजला सादर केल्या अतिशय मार्मिक शब्द फेक भावनि क होऊन रसिकांनी गजला चा आस्वाद घेतला त्यानंतर कवी संमेलन सत्र नयना देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले त्यामध्ये प्रशांत भोंडे विशाल मोहोळ अनिकेत देशमुख गजानन हरणे सुनील लव्हाळे गजानन काळे प्रा. नारायणराव अंधारे सुमित वानखडे राजाभाऊ देशमुख आधी कवींनी आपल्या कविता सादर केल्या धीरज चावरे यांनी सूत्रसंचालन तर उपस्थित कवींचे रामराव पाठखेडे यांनी मानले. तर प्रमुख पाहुणे म्हणून आसरा मीडिया चे संचालक शंकर जोगी उपस्थित होते समारोपीय सत्रामध्ये अहो पाहुणे म्हणून संजय कमल अशोक प्रा.योगेश आवारे प्रा. देवानंद गावंडे आदींची विचार पिठावर उपस्थिती होती साहित्य संमेलन ही काळाची गरज असून साहित्यिकांसाठी आनंदाची परवणी असल्याचे समारोपीय सत्रामध्ये मान्यवरांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.. साहित्य संमेलनाच्या यशस्वीते साठी आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख कविता राठोड राहुल भगत दीपक माहीतकर गोपाल मुकुंदे दिनेश छबिले गणेश मेनकर राजाभाऊ देशमुख आदींनी अथक परिश्रम घेतले
आपल्या प्रतिक्रिया द्या....