मध्यरात्री लघुशंकेला उठलेल्या तरुणाला पायाला काहीतरी दंश झाल्यासारखे जाणवले; परंतु, दुर्लक्ष करून तो झोपी गेला. मात्र, काही मिनिटांतच त्याला अत्यवस्थ वाटू लागले. त्या तरुणाला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. उपचार सुरु असतानाच पहाटे चार वाजता त्याचा मृत्यू झाला. ही घटना जुनी वडसा येथे घडली. अनिकेत खंडाळे (२६, रा. चव्हाण वॉर्ड, जुनी वडसा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.