वाशिम, स्त्री भ्रुणहत्या रोखण्याकरीता व गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र कायदा १९९४ सुधारीत २००३ ची
अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. अनुषंगाने ३० मे २०२४ रोजी जिल्हा सल्लागार समितीच्या सभा संपन्न झाली. या आढावा सभेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रावर कडक निगरानी ठेवण्याची आवश्यकता
आहे. प्रसुतीपूर्व निदान तंत्राचा वापर करुन गर्भलिंग निदान व गर्भपात करणे हे शिक्षेस पात्र आहे. परंतु त्यानंतरही दृष्टीआड गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणा-यावर कायद्येशिर कार्यवाही करावी. असे निर्देश दिले.तसेच यासंदर्भात शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची व गर्भपाताची माहिती देण्या-यास १ लाख रुपये बक्षिस देण्यात येणार असून गर्भलिंग निदान व गर्भपात करणा-यांवर
कठोर कार्यवाहीचा ईशारा देण्यात आला आहे.
समाजात अजुनही स्त्री भ्रुणहत्या करणा-या अमानवी प्रवृतीची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी होत आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्याकरीता शासनाने राज्यस्तरावर टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४४७५ तसेच १०४ व
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव
वाघमारे यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर टोल फ्री क्रमांक ८४५९ ८१४०६० या क्रमांकावर नागरीकांनी तक्रारीची माहिती दिली असता सदर तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. याबाबतची खातरजमा झाल्यावर संबधीत सोनोग्राफी गर्भपात धारकावर न्यायालयीन प्रकरण दाखल केल्यावर माहीती देणा-या व्यक्तीस १ लाख रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले आहे.