तालुक्यातील एकारा -बोदरा गावाजवळ शेळी राखणदाराला आकाशात चमकणाऱ्या उपग्रहाचा सिलेंडर वस्तू मिळाली आहे.
उल्कापिंडासारखी चकाकणारी वस्तू खाली पडताना अनेकांनी पाहिली. नागरिकांमध्ये याबाबत चर्चा रंगल्या होत्या. पण हे इलेक्ट्रॉन रॉकेट बूस्टरचेच तुकडे असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. न्यूझीलंडच्या माहिया बेटावरून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीपासून 430 किमी उंचीवर स्थिरावला. आकाशातून चकाकणारे दिसलेले तुकडे या रॉकेट बूस्टरचेच असावेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
दरम्यान, नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि अनेक राज्यांमध्ये शनिवारी रात्री आकाशात रहस्यमय प्रकाश दिसून आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुध्दा झाला. आकाशात आगीचे भलेमोठे आगीचे गोळे वेगाने जाताना दिसत होते. नक्की हा काय प्रकार आहे, याची प्रचंड उत्सुकता होती आणि शोध लागला की हा उपग्रहाचेच तुकडे आहेत असे मत शास्त्रज्ञानी व्यक्त केले.त्याचबरोबर लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आकाशातून आगीचे लोळ दिसल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात कुतूहल निर्माण झाले आहे. राज्याध्ये जनतेनी आकाशात सर्वांनी केवळ आगीचे लोळ अनुभवले. मात्र या घटनेचा वस्तू स्वरूपातला भाग ब्रम्हपुरी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या एकरा गावाजवळ सिलेंडर गोळा कोसळला आणि तो सिलेंडर गोळा आज दि.५/४/२०२२ ला शेळी चरायला गेलेल्या शेळी राखणदार देवाजी कुळमेथे यांना पोलिस पाटील गुरूदास संग्रामे यांच्या शेतात दिसली.
दिसता क्षणी देवाजी कुळमेथे हा शेळी राखणदार यानी ही माहिती गावातील गुरुदास संग्रामे पोलिस पाटील,अनिल मडावी, राहुल उईके, जगदीश मडावी यांना दिली लगेच त्यांनी गुरुदास संग्रामे पोलिस पाटील सह शेतात जावून आकाशात चमकणाऱ्या उपग्रहाचा सिलेंडर वस्तू हातात घेवून गावामध्ये आणण्यात आली.