"राजिक भाई यांच्या नियुक्ती मुळे कारंजा शहरात काँग्रेसला नवसंजिवनी मिळणार." -अरविंद लाठीया (माजी नगराध्यक्ष.)
कारंजा (लाड) : आपले संपूर्ण जीवन काँग्रेसच्या प्रचार प्रसारासाठी खर्च करणारे, मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकीत खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या विजयासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रचारासाठी आघाडीवर असणारे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल राजिक अब्दुल अजिम (राजिक भाई) यांची दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी, कारंजा शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी मुंबईचे अध्यक्ष आ.हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने राज्य उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे राजिकभाई यांची नियुक्ती केली आहे. राजिकभाई यांच्या नियुक्तीमुळे कारंजा शहरातील काँग्रेस कार्यकर्त्या मध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांनी यावर प्रतिक्रिया देतांना सांगितले की, "राजिक भाई यांच्या नियुक्तीचा निश्चितच कॉग्रेस पक्षाला लाभ मिळणार असून,त्यांच्या सामाजिक कार्याच्या जनसंपर्कामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळून, लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगर परिषद निवडणूकीत पक्षाचे उमेद्वार निवडून आणण्यात फार मोठा हातभार लागणार आहे.