कारंजा (लाड) : शांतीनगर (बायपास) स्थित श्री हनुमान मंदिर कारंजाच्या पंचवीसाव्या प्राण प्रतिष्ठा दिनोत्सवानिमित्त मुंदेकर परिवारातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवार दि.३० मार्च २०२५ रोजी, सकाळी श्रीराम दूत श्री हनुमानजींचा अभिषेक व पूजाविधी आणि सायंकाळी निमंत्रिता करीता प्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. तसेच अगोदरचे दिवशी रात्री ७:०० वाजता भजन-संध्या हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून स्थानिक शांतीनगर व कॉलनी वासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोविंद गुलाबराव मुंदेकर,संजय गुलाबराव मुंदेकर,राहुल संजय मुंदेकर,चि.गौरव,चि.नरेश परिवाराने केले आहे.