कारंजा : कारंजा तालुक्यातील ग्राम शेलुवाडा येथील मुस्लिम स्मशानभूमी कडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचत असल्याने अंतिम संस्कार करण्यास अडचण येत असल्याचा सवाल सर्वप्रथम ग्राम शेलुवाडा येथील युवा पत्रकार संजय लोखंडे यांनी निदर्शनी आणून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्मशानभूमी रस्त्या संदर्भात संपूर्ण कारंजा तालुक्यातील विविध पक्ष, संघटना, कार्यकर्त्यानी आपआपल्या परीने स्मशानभूमी रस्त्या संदर्भात आवाज बुलंद केला . अखेर या मागणीला यश येत असुन याच रस्त्यावरून शेतकरी सुध्दा जाणे येणे करतात त्यांना सुध्दा त्रास होतो याची दखल घेत या कामासाठी आपण पूर्वीच मंजुरात घेतली असुन काम लवकरच निविदा काढण्यासाठी देण्यात येत आहे या कामाची सुरुवात डिसेंबर पर्यंत करून मार्च मध्ये पूर्ण करण्यात येईल.असे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी सांगितले.
या कामास मंजुरात असुन या कामाकरिता आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांना कामाचे त्वरीत टेंडर काढण्याचे सांगितले आहे. काम मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे सांगितले. त्यामुळे हे काम डिसेंबर मध्ये सुरू होत असल्याने शेतकरी यांना या मार्गाने येने जाणे करतांना होणारा त्रास बंद होणार आहे तसेच या मार्गात येणाऱ्या मुस्लिम स्मशान भूमीकडे जाण्याचा मार्ग चांगला होणार आहे. त्यामुळे या कामामुळे या मार्गावरील शेतकरी व मुस्लिम बांधव यांना दिलासा मिळणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता जोशी यांना सुध्दा स्थळ पाहणी करून माहिती सादर करण्याचे निर्देश आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी दिले असल्याचे वृत्त आहे .