वरोरा :- शासकीय औ.प्र.संस्था वरोरा जि चंद्रपूर या संस्थेचे दिनांक 17/09/2023 रोजी PM Skill AUN मॅरॉथॉन स्पर्धेचे संस्थेतर्फे आयोजन करण्यात आले. सकाळी 07.00 वा औ.प्र. संस्था वरोरा येथून सुरुवात करून ती सरदार पटेल वार्ड रेल्वे पुल व परत औ.प्र. संस्था वरोरा पर्यंत एकूण 5 किमी. अंतरांची स्पर्धा घेण्यात आली. मॅरॉथॉन स्पर्धेकरीता कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री प्रफुलजी खुजे, वैद्यकीय उपअधिक्षक, उपजिल्हा रुग्नालय वरोरा तसेच उदघाटन श्री सुरेश बोभाटे जिल्हाध्यक्ष, माजी सैनिक संघटना जि. चंद्रपूर तसेच श्री तानाजी बायस्कर, सहा. प्राध्यापक आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, व
माजी सैनिक श्री रुषीजी मडावी तसेच संस्थेचे प्राचार्य श्री भालचंद्र रासेकर, संस्थेतील कर्मचारी वृंद तसेच स्पर्धक, प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.. श्री सुरेश बोभाटे जिल्हाध्यक्ष, माजी सैनिक संघटना जि. चंद्रपूर मॅरॉथॉन स्पर्धा (पुरुष) तर श्री भालचंद्र रासेकर, संस्थेचे प्राचार्य, मॅरॉथॉन स्पर्धा (महिला) यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे उदघाटन केले त्याकरीता श्री तानाजी बायस्कर, सहा. प्राध्यापक व चमु यांनी कठोर परीश्रम घेतले तसेच वाहतुक नियंत्रक व्यवस्था सुव्यवस्थित करणेकरीता पोलीस स्टेशन वरोरा व कर्मचारी यांनी उत्कुष्ट सहकार्य केले व मा. श्री प्रफुलजी खुजे, वैद्यकीय उपअधिक्षक, उपजिल्हा रुग्नालय वरोरा यांनी रुग्नवाहिका व प्राथमिक उपचार करीता चमु उपलब्द करुन दिली. तसेच शासकीय तत्र शाळेचे पुर्ण वेळ शिक्षिका सौ पौर्णिमा को या बास्केट बॉल या खेळामध्ये राष्ट्रिय पातळीवर प्राविण्य मिळविले असल्यामुळे त्यांनी उत्स्फुर्तपणे स्पर्धकांचे मनोबल वाढवून स्पर्धा यशस्वी करणेकरीता अग्रस्थानी होत्या तसेच त्यांनी महिला स्पर्धकांची विशेष काळजी घेतली. सदर स्पर्धेकरीता पुरुष गट मध्ये प्रथम पारीतोषीक श्री विशाल धनराज जिवतोडे दुसरे। पारीतोषीक श्री सुरज संजय तुळणकर तिसरे पारीतोषीक श्री वैभव महिंद्र आसुटकर यांना मिळाले व महिला स्पर्धकामधून पहिले पारीतोषीक कु सावरी बसता भगत दुसरे पारीतोषीक कु सोमित्रा रविंद्र कुळमेथे व तिसरे पारीतोषीक कु अवतीका ईश्वर बोधाने यांना मिळाले. पारीतोषीक वितरण श्री प्रफूल खुजे, श्री भालचंद्र रासेकर, श्री तानाजी बायस्कर, श्री प्रशांत खिरटकर, सौ पौर्णिमा कोवे, कु जयश्री कुमरे, कु प्रज्ञा कुळमेथे यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पुर्ण करणेकरीता संस्थेचे प्राचार्य श्री भालचंद्र रासेकर, प्राचार्य यांचे मार्गदर्शनात श्री प्रशांत खिरटकर, सौ पौर्णिमा कोवे, कु जे पी कुमरे तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी कठोर परीश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विकास देशमुख तर आभार प्रदर्शन श्री प्रशांत खिरटकर यांनी केले.