अकोला :स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक कार्यक्रम संपूर्ण भारतभर घेतले जात आहेत . त्याचाच एक भाग म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात यावर्षीही दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे दृष्टी गणेशा हा रक्तदान , नेत्रदान व अवयवदानाचा संगीतमय जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला . २६ सप्टेंबर २०२३ रोजी रतनलाल प्लॉट येतील संघर्ष गणेश उत्सव मंडळात सदर कार्यक्रमात गणेश भक्तांनी रक्तदानाचा मोठा संकल्प केला .
या संगीतमय कार्यक्रमात प्रा.विशाल कोरडे , अनामिका देशपांडे नागेश उपरवट , स्वाती मेश्राम , मंजिरी पांडे व शशांक जहागीरदार यांनी शास्त्रीय संगीत , भक्ती संगीत , गणेश वंदना व महाआरती प्रस्तुत केली . विशेष म्हणजे या सामाजिक उपक्रमात दिव्यांग कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला . संगीतमय प्रस्तुती बरोबरच प्रा.विशाल कोरडे , डॉ.संजय तिडके , नम्रता अग्रवाल व नीता वायकोळे यांनी रक्तदान , नेत्रदान व अवयवदानाची आवश्यकता या विषयावर व्याख्यान दिले . कार्यक्रमात उपस्थित भाविक भक्त , मंडळाचे कार्यकर्ते व दिव्यांग बांधवांनी रक्तदान , नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प घेतला . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे दिव्यांग बांधवांना व्हीलचेयर , ब्रेल बुक्स , व्हाईट केन व शिष्यवृत्ती दिली जाणार असून गरजू दिव्यांगांनी ०९४२३६५००९० या संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आव्हान कोषाध्यक्ष श्री.विजय कोरडे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनामिका देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन कुणाल नेरकर यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागर काळमेघ , श्रीकांत कोरडे , संजय फोकमारे , अस्मिता मिश्रा , अंकुश काळमेघ व तपस्या गोलाईत यांनी सहकार्य केले .