वाशिम : अकोला येथील साप्ता.व्हॉइस ऑफ विदर्भचे संपादक विजय देशमुख यांची असोशिएशन ऑफ स्मॉल अँन्ड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या अमरावती विभागीय अध्यक्षपदी तर साप्ता, "व्यथा ग्रामस्थांच्या" वृत्तपत्राचे संपादक आकाश कोकाटे यांची अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची ही नियुक्ती २०२५ या वर्षाकरिता असून,संघटनेचे राज्य सचिव सुभाष लहाने यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश शाखेचे राज्य अध्यक्ष प्रदीप दे. कुलकर्णी यांनी पत्राव्दारे नियुक्ती केली आहे. अमरावती विभागात संघटना बळकटीकरिता प्रयत्न आणि वेळोवेळी होणार्या संघटनेच्या बैठकीत उपस्थित राहावे,अशी अपेक्षा राज्य अध्यक्ष यांनी नियुक्तीपत्रातून केली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल वाशिम जिल्ह्याचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार तथा विदर्भ लोककलावंत संघटना वाशिमचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी अभिनंदन केले आहे.