वाशिम - समाजाला एकजूट करणार्या व १० लाख सदस्यांची संघटना असलेल्या सावता परिषदेच्या वाशिम जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी येथील सक्रीय कार्यकर्त्या व समाजसेविका सौ. रंजना संतोष पारिसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शनिवार, ३ मे रोजी रिसोड येथील विश्रामगृहात पार पडलेल्या एका बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणकाका आखाडे, प्रदेश कार्याध्यक्ष पांडूरंग कोठाळे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष विलास ढगे, वाशिम शहराध्यक्ष नितेश वानखेडे, रिसोड शहराध्यक्ष नितेश सोनुने, ईश्वर ढगे आदींच्या उपस्थितीत सौ. रंजना पारिसकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. सौ. रंजना पारिसकर ह्या गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेत कार्यरत असून समाजाच्या विकासासाठी त्या पुढाकार घेत असतात. या कार्याची दखल घेवून त्यांच्यावर महिला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीमुळे सौ. रंजना पारिसकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या जबाबदारीमुळे काम करण्याचा उत्साह वाढला असून समाजाचे सशक्त संघटन करण्यासाठी अधिक जोमाने कार्य करु अशी ग्वाही सौ. पारिसकर यांनी निवडपत्र स्विकारतांना दिली.