गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेचे सल्लागार मा.भिमराज पात्रिकर* यांनी गुणवंताचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचा आजवरचा प्रवासव्दारे प्रास्ताविक मांडले. प्रमुख मार्गदर्शक *मा.किरणजी गावतुरे*=केवळ सत्कारापुरते मर्यादीत न राहता गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करुन पुढे कसे नेता येईल याबाबतचा आदर्श गडचिरोली जिल्हा संघटनेकडुन घ्यावा असे म्हटले. *मा.सुरज तोरणकर*=स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतांना आरोग्य जपणे किती महत्वाचे हे स्वअनुभवातुन विषद केले, ठेवलेल्या टारगेटबाबत अपयश आलेच तर बी प्लान ठेवावा. *मा.साहिल लोनबले*=मित्र व जिल्हा माळी संघटना यांच्या सहकार्याने यश संपादन केल्याचे कृतज्ञतापुर्वक कबुल करुन चांगल्या संगतीत राहण्याचे महत्व विषद केले. *मा.प्रा.संजय लेनगुरे*=विविध फॅकल्टीजची माहिती दिली. *मा.मोहिनी मोहुर्ले*=योग्य कौन्सलिंगचे महत्व पटवुन सांगितले.
॰
त्यानंतर *10वी* गुणवंत मंजीरी सुदर्शन मोहुर्ले, सानिका मुक्तेश्वर कोटरंगे, संचीता भाष्कर शेंडे, प्रतिक सोनुले, आर्या नुतन लेनगुरे, शिवम ज्ञानेश्वर निकोडे, माहि घनशाम मांदाडे, समृद्धी राजेंद्र आदे, प्रणय बालाजी रस्से, भाग्यश्री श्रावण गुरनुले, तोशिका कैलास सुर्यवंशी आणि *12 वी* गुणवंत प्राची निकोडे, नेहा रमेश लोनबले, विकास नंदकिशोर लोनबले, मोनाली विष्णु निकोडे, वैष्णवी गुरुदास मोहुर्ले तसेच अरुणा मारोती जेंगटे-वाढई पर्यवेक्षिका, चेतन कुसन जेंगटे आरोग्य सेवक, डॉ.देवेश्री शामराव सोनुले BHMS, वनिता गजानन जेंगठे-मांदाडे, आरोग्य सेविका यांचा *नियुक्तीबद्दल सत्कार* दिशा लोनबले हीच राज्यस्तरीय बाॅक्सींग स्पर्धेत यश संपादन करण्या बाबत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेवजी जेंगटे, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पाहुणे महिलाध्यक्षा कांता लोनबले होते. संचालन नरेंद्र रस्से व आभार प्रभाकर कोटरंगे* यांनी मानले. यशस्वीतेसाठी रमेश जेंगठे, योगेश सोनुले, अशोक मांदाडे, गुरुदास बोरुले, फुलचंद गुरनुले, पुरण पेटकुले, किरण शेंडे, नरेंद्र निकोडे, किसन सोनुले, संतोष मोहुर्ले, शंकर चौधरी, लक्ष्मण मोहुर्ले,भाष्कर गुरनुले, इतर सर्वांनी मदत केली. कार्यक्रमास विद्यार्थी-पालक व समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....