जाहीर केलेल्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी दि.२९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असताना कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांचे चिरंजीव ॲड.ज्ञायक पाटणी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या कार्यकर्ते आणि मतदारांकडून,कारंजा मंगरूळपीर मार्गावरील जनसंपर्क कार्यालयापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरापर्यंत विराट अशी रॅली काढून शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले.या वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उल्लेखनिय म्हणजे दिवंगत आमदार स्व.राजेंद्र पाटणी ह्या त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर स्वतःचे दुःख बाजूला सारून त्यांनी चौथ्या दिवशीच कारंजा मानोरा मतदार संघात चक्रीवादळ आणि गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्याच्या बांधावर जाऊन त्यांना शक्य तेवढ्या मदतीचा हातभार लावलेला होता. शिवाय तेव्हापासून त्यांनी गावोगावी खेडोपाडी घरोघरी या मतदारसंघात हात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अशातच त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची आशा असताना ऐनवेळी भाजपाने
उमेदवारी नाकारली.त्यामुळे नाराज होऊन त्यांनी महाविकास आघाडीचा हात धरला.आणि मतदारांच्या आग्रहास्तव कारंजा मानोरा विधानसभेकरीता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवली.त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच पूर्वी ते भाजपमध्ये असल्याने त्या कार्यकर्त्यांचा देखील मोठा पाठिंबा असल्याचे रॅलीतून
प्रथमदर्शनी दिसून आले.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मतदान करण्याची भावनिक साद घातली. ३५ कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे यांनी तहसीलदार कुणाल झाल्टे व संतोष यावलीकर यांच्या उपस्थितीत अँड ज्ञायक पाटणी यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारल्या गेला असल्याने त्यांचे बाबत मतदारांमधून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.