वाशिम : निती आयोगामार्फत आकांक्षित जिल्हा कार्यक्रम व आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येकी ६ निर्देशांकाच्या पातळीपर्यंत पोहचविण्याकरिता
३० सप्टेंबर पर्यंत “संपुर्णता अभियान” राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने खालील गोष्टींची पुर्तता करावयाची आहे.
जिल्हा / तालुका स्तरावर संबंधीत निर्देशांकाचा ३ महीन्याचा कृती आराखडा तयार करावयाचा आहे. प्रत्येक महिन्यात निर्देशकाचा प्रगती अहवाल सादर करावयाचा आहे.जिल्हा/तालुका स्तरावर जन-जागृती, परिवर्तन अभियान राबवावयाचे आहे.
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी सदर बाबत क्षेत्रीय पाहणी करायची आहे. तरी सदर अभियानाचा उदघाटन कार्यक्रम ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. असे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांनी कळविले आहे.