कारंजा : सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याकरीता आणि लोककलावंत तथा दिव्यांग बांधवाच्या मागण्या शासन दरबारी मांडून त्यांची पूर्तता करून घेण्याच्या उद्देशाने सामाजिक हिताकरीता हिवाळी अधिवेशनाच्या निमिताने विधानभवनात कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाची कलावंत मंडळी तथा पत्रकार मंडळी गेलेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष संजय कडोळे, प्रदिप वानखडे, नंदकिशोर कव्हळकर , उमेश अनासाने, पांडूरंग माने, पत्रकार किरण क्षार, सुनिल फुलारी, विजय खंडार दामोदर जोंधळेकर इत्यादी होते.
आजपर्यंत कितीतरी निवेदने मंत्रालयात पाठवून संजय कडोळे यांनी या संबधी पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. तसेच आमदार राजेंद्र पाटणी तथा आमदार ऍड किरणराव सरनाईक यांना लक्ष्यवेधी मांडण्याची विनंती केली होती तसेच याप्रसंगी अधिवेशनात आ. बच्चुभाऊ कडू, आ. चंद्रशेखर बावनकुळे, उत्पादन शुल्क मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना शंभूराजे देसाई, काँग्रेसचे विरोधी नेते नाना पटोले यांना प्रत्यक्ष भेटून सभागृहात लोककलावंत तथा दिव्यांगाची मागणी पूर्ण करण्याची विनंती केली.
असता आ.बच्चुभाऊ कडू यांनी सांगीतले की, आपल्या हक्काचे मंत्रालय आता झालेली आहे. लवकरच दिव्यांगांचे अनुदान सुद्धा वाढविण्यात येईल. शासन त्याकरिता अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले.
तर आ. ऍड सरनाईक यांनी मी स्वतः मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून समोरा समोर चर्चा केल्याचे त्यांनी सांगीतले. व लवकरच कलाकार मानधनात वाढ होण्याचे आश्वासित केले असल्याचे कळवीले. शिवाय दोन महिन्यांचे कलाकार मानधन पात्र लाभार्थ्याना पाठविण्यात आल्याचेही त्यांनी कळवीले.
एकंदरीत समाजहिताच्या सकारात्मक भेटीबदल संजय कडोळे यांनी सर्वांचे आभारही मानले.