कोंडोली (प्रतिनिधी- सागर कोटलवार ): ची.रुद्राक्ष सुनील पवार. यांनी इंडियन आर्मीचे नर्सिंग असिस्स्टंट टेक्निकल सोल्जर हे खडतर ट्रेनिंग यशस्वी पणे पूर्ण करून वाशिम जिल्ह्याचा मानोरा तालुक्यातील मुळगावी कोंडोली येथे भेट दिली.
त्यांचे वडील सुनील शंकरराव पवार रा.कोंडोली ता.मानोरा जि. वाशीम हे स्थानिक रहिवासी असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. रुद्राक्ष सुनिल पवार यांना बालपणा पासूनच आपले खेडेगाव कोंडोली, गावातील गावकरी, मातृभूमी आणि देशसेवेची आवड होती. अखेर त्यांचे स्वप्न पूर्णत्वास जाण्याकरीता त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. कोडोंली येथे त्यांचे आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम आपले ग्रामदैवत श्री.पितांबर महाराज गुरु गजानन महाराज संस्थानला येवून दर्शन घेतले.त्यानंतर सरपंच लक्षमीबाई इंगोले ,शाम पवार , स्वप्नील कोटलवार ,गौरव पवार , ऋषीकेश पवार, सुनील शंबोले आणि पिताबरं महाराज संस्थानमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी गावकरी आणि महिला मंडळ मोठया प्रमाणावर उपस्थित होते. असे वृत्त आमचे ग्रामिण प्रतिनिधी सागर कोटलवार यांनी कळवीले आहे.