अर्चना कदम ह्या नेचरपॅथीच्या डॉक्टर असून योग प्राणायाम ध्यान द्वारे व मर्म चिकित्सेद्वारे अनेक बेडवर झोपलेल्या पेशंटला त्यांनी चालते केले आहे त्यामुळे त्या सर्व परिचित झाले आहे, सामाजिक उपक्रमामध्ये त्या सहभागी असतात त्यामुळे त्यांना समाजसेविका हा पुरस्कार देखील मागच्या वर्षी मिळाला त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार ,सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार ,नारी रत्न पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहे त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन जैन महिला महा समितीने त्यांना हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी दि जैन महा समितीच्या महाराष्ट्र प्रकोष्ठ जयश्रीताई चानेकर व पं स गटविकास अधिकारी पुनम राणे समुपदेशक स्वाती आगरकर महिला महा समितीच्या महिला महामंत्री प्रणिता ताई फुर्सुले आणि महा समितीच्या सर्व सभासद ,सदस्य उपस्थित होत्या