अकोला/वाशिम : आपल्या अचूक अंदाजाने ग्रामस्थ शेतकऱ्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील ग्राम रुई गोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दि.27 एप्रिल 2024 रोजी मे महिना व जून महिन्याचे पावसाचे अंदाज व्यक्त करतांना, पूर्व व पश्चिम विदर्भ,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र,मध्यप्रदेश इत्यादी भूभागासह अमरावती महसूल विभागात दि. 25 मे 2024 ते दि 28 मे 2024 पर्यंत रोहिणी नक्षत्रात मान्सूनपूर्व (वळवाचा) चांगला पाऊस होणार असल्याची आपल्या अंदाजाची भविष्यवाणी केली होती.त्यानुसार जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सर्वदूर रिमझिम ते चांगला पाऊस होतच असून दि. 26 मे 2024 रोजी अकोला जिल्ह्यात अकोला, बाळापूर, पातूर,अकोट येथे ग्रामिण भागासह शहरात सोसाट्याचा वारा आणि चांगला पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव,मेहकर, खामगाव इत्यादी ठिकाणी तर यवतमाळ जिल्हयाच्या सर्वदूर ग्रामिण भागात चक्रीवादळ होऊन अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. टिनपत्रे उडून गेलीत. महागाव तालुक्यात टिनपत्रे लागल्याने ग्रामस्थ जखमी झाले.घरांची पडझडही झाली.वाशिम जिल्ह्यात मानोरा,मंगरूळपिर ग्रामिण भागात रिमझिम सरी जाणवल्यात.मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याच्या चाकूर येथे विज पडून झालेल्या नैसर्गीक आपत्तीत स्व. शिवाजी नारायण गोमचाळे व स्व. ओंकार लक्ष्मण शिंदे या दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. असे वृत्त आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळविल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले.तसेच या पुढील तिन दिवसाचा अंदाज म्हणजे उष्णता वाढून,तिव्र उकाडा जाणवणार असून महाराष्ट्राच्या किनार पट्टीसह पूर्व पश्चिम विदर्भात चक्रीवादळ,विजा पडणे, कोठे मुसळधार तर कोठे रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने, ग्रामस्थ व शेतकरी राजाने स्वतःच्या व पाळीव जनावराच्या जीवितीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच पावसाचे वातावरण दिसताच शेतात न थांबता दुपार पूर्वीच घरी परतावे. हिरव्या झाडाचा आसरा घेऊ नये.शेतातील ऊंच असलेल्या हिरव्या झाडावर विज पडण्याची शक्यता जास्त असल्याने झाडाखाली थांबू नये व जनावरे बांधू नये.असे कळविण्यात येत आहे.