आम्ही कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (B.A.M.S.)संपूर्ण महारष्ट्र राज्यात २०१९ पासून सुमारे १४०० B.A.M.S. वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामीण भागात मुख्यालयी राहुन कोरोना महामारीच्या दोन्ही लाटेत उत्तम कार्य पार पाडले व आज पर्यंत पार पाडत आहोत.
मागील वर्षी जुन महिन्यात रातो-रात मंत्रिमंडळ निर्णय घेवून राज्य शासनाने कोरोना दोन्ही लाट संपल्या असतांना १८९९ M.B.B.S राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी गट अ यांना कोणतेही शासकीय अनुभव नसतांना कोणतीही MPSC सरळ सेवा मुलाखत न घेता टक्केवारीच्या अनुक्रमाने भरती केली.व प्राथमिक आरोग्य केंद्रातील B.A.M.S वैद्यकीय अधिकारी यांना नोकरी वरून घरी पाठवीले, तसेच या वर्षी २०२२ मध्ये DMRE BOND च्या नावाखाली कार्यरत असणारे जवळपास ५०० BAMS अधिकारी यांना येणाऱ्या १० दिवसात घरी पाठविण्याचा घाट रचला आहे. सदरील ठिकाणी वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र ठिकाणी कार्यरत असताना देखील रीक्त्तपदे दाखविली असून त्या ठिकाणी नवीन एम.बी.बी.एस BONDED यांना रुजु करण्याचा आदेश दिला आहे . तरी हि प्रक्रिया तत्काळ २ दिवसात थांबविण्यात यावी अशी मागणी आम्ही १३/७/२०२२ रोजी केली होती परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आम्ही१८/७/२०२२पासून यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत कामबंद आंदोलन करत आहो त्यावेळी संपूर्ण जिल्यातले ५० बि. ए. एम. एस वैद्यकीय अधिकारी उपस्थित होतो