अकोला- गुढीपाडव्यानिमित्त स्थानिक बिर्ला राम मंदिरात संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दरवर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या वतीने स्व. अंबरिश कविश्र्वर युवा पत्रकार पुरस्कार आज शुक्रवार दि.१२ एप्रिल रोजी डॉ.विनायकराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला.
पुरस्काराकरिता नेमण्यात आलेले जेष्ठ पत्रकार महेंद्रजी कविश्र्वर, निलेशजी जोशी, मिलिंदजी गायकवाड या समितीच्या माध्यमातून यावर्षी चा युवा पत्रकार पुरस्कार श्री.मनोज भिवगडे,
यांना देण्यात आला. ३१०० रू. रोख आणि स्मृतचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मागील सहा वर्षांत आपण खालील प्रमाणे पुरस्कार दिले प्रथम वर्ष मोहन शेळके,दुसरे वर्ष शंतनु राऊत,तिसरे वर्ष आशिष गावडे,चौथे वर्ष करुणा भांडारकर,पाचवे वर्ष संतोष ऐलकर व ६ वर्ष नितीन गव्हाळे या वर्षी ७ आता मनोज भिवगडे
दरवर्षीप्रमाणे हिंदू नववर्ष तथा श्रीराम नवरात्र निमित्त आयोजित डॉ. भूषण फडके यांच्या ओजस्वी निरुपण तथा संगीत श्रीराम कथा दि.९ एप्रिल ते १३ एप्रिल पर्यत रोज संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत जठारपेठ मधील बिर्ला राम मंदिर येथे अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प तथा निलेश देव मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित केला होता.
सर्व राम भक्तांनी या सुमधूर संगीत श्रीरामकथेला उपस्थिती होती.
या कार्यक्रमात श्रीराम कथेचे अभ्यासपूर्ण निरूपण डाॅ. भूषण फडके यांनी केले. सहयोगी कलावंत सौ. वैशाली फडके, निखिल देशमुख, हार्दिक दुबे, सुमंत तह्राळकर. लहान असूनही गीत रामायणातील गीते चि. देवाषिश फडके याने तयारीने सादर केल्याबद्दल डॉ.विनायकराव देशमुख,यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
सहभागी इतर कलावंतांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.
डॉ.विनायकराव देशमुख, प्रा.नितीन ओक, जेष्ठ पत्रकार महेंद्र जी कविश्वर, सौ.अंजलीताई कविश्वर ,निलेश जी जोशी, मिलींद जी गायकवाड, महेश जी जोशी, , जयंतराव सरदेशपांडे, सौ.रश्मी देव, यांच्या उपस्थित समरंभ झाला
आपल्या प्रतिक्रिया द्या....