वाशिम : जिल्ह्यातील साहित्यीक लोककलावंताच्या न्याय हक्का करीता सदैव कार्यरत राहून,शासन दरबारी अथक पाठपुरावा करून,आजतागायत ज्येष्ठ,वयोवृद्ध लोककलावंताच्या मागण्यांची पूर्तता करण्यात 100 % यशस्वी ठरलेल्या विदर्भ लोककलावंत संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा कारंजा (लाड),मानोरा आणि मंगरुळपिर तालुक्यातील वयोवृद्ध कलावंताच्या समस्या सोडविण्यात आल्यात.याबाबत सविस्तर वृत्त असे की,कारंजा (लाड) मानोरा,मंगरूळपिर शहर व ग्रामिण भागामधील जेवढ्या वृद्ध महिला पुरुष कलावंताच्या बाबतीत,सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संकेतस्थळावर आधार कार्ड,मोबाईल व वारसदार नोंदणी करीता व्यत्यय येवून अडचणी येत होत्या. व ही कलाकार मंडळी ऑनलाईन नोंदणी पासून वंचित राहीली असल्याने यदाकदाचित वृद्ध कलाकारांचे पुढील मानधन रोखल्या गेले असते.किंवा कायमचे बंद झाले असते.म्हणून विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी शुक्रवारी दि. 17 मे 2024 रोजी जिल्ह्यातील शेकडो लोककलावंतासह जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयात धडक दिली.व अतिशय सामंजस्य व सामोपचाराने समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक दिनेशबाबू लहाडके यांना वस्तुस्थितीची जाण करून दिली. तसेच समाजकल्याणच्या अधिकारी कर्मचारी आणि लहाडके बाबू यांनी देखील सहकार्याची भावना ठेवून 100% सहकार्य करीत सर्व वयोवृद्ध महिला पुरुषांची ऑनलाईन नोंदणी करून त्यांचे समाधान केले.अखेर त्यांच्या मानधन प्राप्तीचा मार्ग मोकळा झाला.याबद्दल विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,उमेश अनासाने, प्रदिप वानखडे,हभप लोमेश पाटील चौधरी,हभप अजाब महाराज ढळे,सुरेश हांडे गोंधळी, कांताताई लोखंडे,इंदिराबाई मात्रे, शोभाबाई मापारी,सुधाताई डाके, धनराज महाराज जाधव यांनी त्यांचे आभार मानले.तसेच गेल्या पाच वर्षातील प्रलंबित असलेल्या नविन मानधन लाभार्थ्याच्या निवडीकरीता दि. 04 मार्च ते 10 मार्च 2024 दरम्यान घेण्यात आलेल्या सादरीकरणा मधून लवकरात निर्णय घेऊन लवकर नविन लाभार्थ्याची यादी जाहीर करून त्यांना नव्याने मानधन सुरु करावे. अशी मागणी करण्यात आली.शेवटी लोककलावंताच्या मंत्रालय स्तरावरील विविध समस्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला अवगत करून सांस्कृतिक कार्य संचालनालयाला जिल्हाधिकारी वाशिम यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.असी माहिती विलोसचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.