उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन.... .!वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा लिना रामटेके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन.....
ब्रम्हपुरी:-
वंचित बहुजन आघाडी चंद्रपुर जिल्हाच्या वतीने आम्ही ब्रम्हपुरी तहसिल कार्यालय उपविभागीय अधिकारी यांच्या कडे हे निवेदन सादर करीत आहोत.
केंद्र सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडेल अशी प्रत्येक घटकासाठीची महागाईत वाढ झाली आहे.
केंद्र सरकार भांडवलदाराचे सरकार आहे त्या प्रमाणे वागत आहे.
केंद्र आणि राज्य सरकार ने त्यांच्या अखत्यारित असलेल्या पेट्रोल आणि डिझेल चे भाव इतके वाढवले आहे. कि सर्वसामान्यांचे जगणे अगदी कठीण झालेले आहे.
गँस चे दर ही इतके वाढवले आहे, भांडवलदारांचा फायदा व्हावा या हेतुने गँसचे दर वाढ केले आहे. त्यामुळे या वाढत्या महागाईमुळे रोजचा खर्च कसा करावा,रोज पोटभर दोन वेळेचे जेवणासाठी चा सर्वसामान्यांना भ्रांत पडली आहे. मुलांचे शिक्षण ही होऊ शकत नाही अशी अवस्था झालेली आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ही महागाई जर कमी केली नाही तर, पुढे उदभवणार्या परिस्थीतीला हे दोन्ही सरकार जबाबदार असणार आहे. आणि घरगुती गँस आणि इतर जीवनाश्यक वस्तुचे भाव जर कमी केले नाही तर पुढील काही दिवसात आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत.
तसेच समाजात जागोजागी जातीविषयक दंगली घटना घडत असल्याने देशात अशांतता निर्माण होत आहे त्यामुळे देशात शांतता राहावी व जातीयतेची तेढ निर्माण करू नये.व जीवनावश्यक वस्तूंचे भाव जर कमी केले नाहीत तर पुढील काही दिवसा त आम्ही हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा वंचित बहुजन महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षा लीना ताई रामटेके यांनी यावेळी दीला.
निवेदन देताना यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षा लीना ताई रामटेके, वंदना कांबळे, प्रीती हुमणे जिल्हा सचिव, मृणालीनी सहारे,प्रतीमा डांगे, योगीता रामटेके, अस्मिता लोखंडे, लता मेश्राम, शीतल गायकवाड, प्रमीला पाटील,जास्वंदा घुटके, कीरण मेश्राम व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
आपल्या प्रतिक्रिया द्या....