अकोला-- महात्मा गांधीजींनी चरखा, खादी ही आम्हाला दिलेली महान देण आहे. खादी हे केवळ वस्त्र नाहीतर समता-समर्पणाचा एक विचार आहे असे प्रतिपादन सर्वोदयी कार्यकर्ता दिलीप शोभ राज साधवानी यांनी केले.
अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने गांधी जवाहर बागेत आयोजित सर्वोदय संवाद अभियानाचे शुभारंभ प्रसंगी बोलत होते. सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते .ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, सर्वोदय शेतकरी मंचाचे श्रीकृष्ण विखे, अकोला जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विवेक हिवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृती सप्ताहानिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ गावागावात, वार्डात, वाडी वस्तीत जाऊन गांधी विचाराचा प्रचार प्रसार करणार आहे . व्यसनमुक्ती ,निसर्गोपचार यावर आधारित प्रदर्शन ,सर्वोदय मित्र नोंद करणे, लोकसेवक नोंदणी ,शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांना सर्वोदय चळवळीशी जोडून घेणे यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले असल्याची माहिती सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी दिली.
महादेवराव भुईभार, श्रीकृष्ण विखे,प्रा.विवेक हिवरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.कवी रामराव पाटेखेडे यांनी व्यसनमुक्तीवर कविता सादर केली.बागेत निसर्गोपचार व व्यसनमुक्ती प्रदर्शनी पाहण्यास विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्वोदय मंडळाचे सचिव डॉ.मिलिंद निवाणे यांनी संचालन केले. आभार प्रदर्शन गुरुचरणसिंह ठाकूर यांनी केले.
केळीवेळी सर्वोदय मंडळाचे विठ्ठलराव हिवरे,हिम्मतराव गावंडे, अनिल वाघमारे, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे दिलीप सरदार , मधुकर आनंदा इंगळे, मोहन बाळू राठोड, बाबूजी शिंदे आगर, दशरथ म्हात्रे, रविकांत महादेवराव हुरपडे, प्रा. दत्तात्रय भाकरे, आत्माराम शेळके, विलास बोराडे, देविदास नेमाडे, प्रशांत लोडम, श्रीकृष्ण माळी, देविदास नेमाडे, रोहित तारकस, किशोर कुमार मिश्रा, मंगेश अंबादास बसू, वासुदेवराव काळमेघ, प्रा.सुधाकर गौरखेडे, सविता शेळके, सुमित्रा निखाडे, पुनम उमाळे, महेश आढे,ऋषिकेश निमकंडे, अनिल मावळे,किरण शेळके यांचे सह सर्वोदयी कार्यकर्ते व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....