आरमोरी:- विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आज दि.१२/५/२०२४ ला युवारंग संघटने तर्फे आयोजित समर कॅम्प चा उद्घाटन सोहळा पार पडला या समर कॅम्प च्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा.डॉ. निलकंठ मसराम सर उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून मा.प्रकाश पंधरे सर तर प्रमुख अतिथी म्हणून युवारंग चे संस्थापक तथा अध्यक्ष मा.राहुलजी जुआरे सर गडचिरोली जिल्हा रक्तदाता समितीचे अध्यक्ष मा. चारुदत्त राऊत सर ,युवारंग समर कॅम्प चे संयोजक मा.शुभम वैरागडे सर,मा.कुंभारे मॅडम उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप,आरमोरी च्या विद्यार्थिनी कुमारी. गौरी वनकर ,पलक हिरापुरे, गुंजन हिरापुरे यांनी कराटे चे प्रात्यक्षिक करून दाखविले या समर कॅम्प ला शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला या समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना कबडी, खो-खो ,कराटे , क्रिकेट ,योगा, डान्स, चित्रकला ,पत्रकारिता, शेती- आयुर्वेद , वाहतुकीचे नियम जनजागृती ,वन्यजीव संरक्षण याबद्दल माहिती दिली जाणार आहे या समर कॅम्पच्या उद्घाटन कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवारंग चे सदस्य मा.रोहित बावनकर, पंकज इंदूरकर, स्वप्नील जुआरे, अंकित बन्सोड ,प्रिन्स सोमनकर, वैभव सहारे यांनी मेहनत घेतली.