कारंजा (लाड) : नगर पालिका हद्दीतील,दिव्यांगाच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने,मा.महेशजी वाघमोडे मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग कल्याण केंद्राचे उद्धाटन येत्या शुक्रवार दि.१७ ऑक्टोंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे,सदरहू कार्यक्रम कारंजा येथील जाणता राजा चौक,छत्रपती शिवाजी महाराज नगर कारंजा येथे होऊ घातला आहे,नगर पालिकेच्या दिव्यांग विभागाचे स्वतंत्र कार्यालय "दिव्यांग कल्याण केन्द्र" सुरु करण्यात येणार असून सदरहू कार्यालयाचा उद्घाटन समारंभ कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय महिला आमदार मा.श्रीमती सईताई डहाके यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.दिव्यांग कल्याण केन्द्राचा हा उद्घाटन समारंभ दि. १७ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता संपन्न होणार असून,सदर कार्यक्रमाला कारंजा शहरातील जास्तित जास्त दिव्यांग बांधव आणि दिव्यांग महिला भगीनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारंजा नगर परिषदेतर्फे मुख्याधिकारी महेशजी वाघमोडे यांनी केले आहे.