कारंजा (लाड) : गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचाच नव्हे तर आपल्या शहराचा सुद्धा सर्वांगीन विकास सर्वार्थाने रखडलेला आहे. वंदनिय बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग असूनही,संपूर्ण आशिया खंडातील पहिल्या क्रमाकांची आपली शेतमालाची कृषी उत्पन्न बाजार समिती ही बाजार पेठ असतांना येथे शेतकऱ्याच्या शेतीला सिंचनाची सोय नाही.,शेतमालावर प्रक्रिया करणारी केन्द्र,शितगृह नाही, दुग्ध संकलन केन्द्र बंद पडलं आहे., शेतमालावर आधारीत उद्योग कारखाने नाहीत.आपले शहर शिक्षणाची पंढरी असतांना येथे उच्च पदवीधर शिक्षणाची कोणतीही सुविधा नाही.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. सुशिक्षित बेरोजगार,मजूर, कामगार, महिला मजूरांना काम देणारी साधी औद्योगीक वसाहत नाही.आमच्या जैन धर्मियांचे व दत्त संप्रदायाचे श्री नृसिह सरस्वती संस्थान येथे असतांना कारंजा शहराचा अद्यापपर्यत तिर्थक्षेत्र आराखडा झालेला नाही. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सोहोळ काळविट अभयारण्याचा विकास रखडलेला असून,पुढील कामे बंद पडली आहेत. त्यामुळे सर्वत्र ही सर्वांनीन विकास कामे तात्काळ सुरू व्हावी व रोजगार - व्यवसायाची साधने उपलब्ध व्हावीत. ह्याकरीता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघामधून आपल्या हक्काचा, हजरजवाबी व कर्तव्यतत्पर असलेला खासदार म्हणून महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेद्वार संजय देशमुख हेच निवडून येणे ही वर्तमान काळाची गरज आहे.म्हणून सर्व मतदारांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे उमेद्वार संजय देशमुख यांना जास्तित जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन कारंजा येथील युवानेते रोमिल लाठीया यांनी मतदारांना केले आहे.