अकोला : जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला ,जागतिक महिला दिना निमित्त गुरुवार दि.7 मार्च 2024 रोजी, युवाक्रांतिसेना व होटल दिल्ली दरबार,पातुर रोड ,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने,अकोला येथील अष्टपैलू कलावंत तथा सेवाव्रती समाजसेवकाकरीता "अकोला भूषण पुरस्कार 2024" चे भव्य आयोजन करण्यात आले होते.यावेळी अकोला येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरिय व्यसनमुक्ती पुरस्कार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक रामटेके यांना युवा क्रांति सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सैयद अंसार अली ,व तारिक खान संचालक होटल दिल्ली दरबार ,जेष्ठ समाजसेवक गजनन भाऊ हरणे, किर्ती डोंगरे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र ,सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन अकोला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे अशोक रामटेके हे गेल्या 35 वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांना या आधी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ति सेवा पुरस्कार,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार तसेच राष्ट्रीयस्तरावर एम एस स्वामीनाथन ट्रस्ट चेन्नई च्या वतीने दिला जानारा जमशेटजी टाटा पुरस्कारासह 25 च्या वर विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध पदावर कार्य करीत असून त्यांना वरील पुरस्काराने सन्मानित केल्या बद्दल विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .