वाशिम : जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील दारव्हा रोडवरील सोमठाण्यापासून,मानोरा तालुक्यातील इंझोरी पर्यंत व पुढे मंगरूळपिर मार्गावरील सोहळ पर्यंत विस्तारित असलेल्या, "सोहळ काळविट अभयारण्यात" शेकडो रोही,शेकडो हरिण, निलगायी,रानडुक्कर इत्यादी प्राण्याचे कळपच्या कळप अगदी सहजपणे सोमठाना येथील घाटात,इंझोरी घाटात दररोज हमखासपणे वेळोवेळी दिसून येत असतात.तसेच अभयारण्यात मोर,लांडोर,चिमण्या,तितर,बटेर, कोकीळ,कावळे,बगळे इ. अनेक पक्षी सुद्धा आढळून येतात.शिवाय या मार्गाने मार्गक्रमण करीत असतांना अनेकदा वन्यप्राण्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहन अपघाताच्याही घटना घडलेल्या असून, रानडुकराच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाल्याच्या देखील घटना घडलेल्या असून, काही वर्षापूर्वी दिघी येथील अल्पभूधारक स्व.सुदाम लोखंडे यांनाही आपला जीव गमवावा लागला होता.तसेच वन्यप्राणी हरिण-रोही यांच्या हैदोसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे शेतातील उभे पिकही उध्वस्त होऊन अल्पभूधारक व इतरही शेतकऱ्यांचे वेळोवेळी नुकसान होत असते.त्यामुळे या संपूर्ण अभयारण्याला आवारभिंत घ्यावी. तसेच पर्यटका करीता हे अभयारण्य प्रेक्षणिय स्थळ म्हणून खुले करण्याची मागणी होत आहे.या वस्तुस्थितीमुळे "सोहळ काळविट अभयारण्यातील" सुद्धा पशू-पक्षी गणणा, निश्चितपणे शासनातर्फे वनविभागाने वैशाख पोर्णिमेला केलीच असावी.असा स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्याचा अंदाज असून, वनविभागाने हे जाहीर केले असते तर, वन्य प्राण्यांची व पक्षांची नेमकी संख्या कळली असती शिवाय अनेकदा अभयारण्यात व्याघ्र प्रवर्गातील बिबटे हे प्राणी असल्याच्या अधून मधून होणाऱ्या चर्चेतील सत्य ग्रामस्थ व शेतकऱ्यांना कळले असते.