झारखंड मधील मधुबन जिल्ह्यातल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थस्थळ सम्मेद शिखरजी येथे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेल यांनी चार पशूंची बळी दिली. याचा निषेध जैन धर्मा तर्फे करण्यात आला. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देत कारवाई ची मागणी करण्यात आली.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याद्वारे 19 जुलै रोजी सम्मेद शिखरजी या जैन धर्माच्या पवित्र तीर्थस्थळी चार पशूंचा बळी देण्यात आला. या घटनेला घेऊन देशातील संपूर्ण जैन समाज संताप व्यक्त केला आहे .सम्मेद शिखरजी हा जैन धर्मियांचे सर्वोच्च तीर्थस्थळ मानले जाते. 24 तीर्थस्थळापैकी वीस तीर्थस्थळाची ही निर्वाण भूमी आहे. जैन समाज हा अहिंसाच्या मार्गावर चालणारा धर्म असून जैन धर्मियांच्या अति पवित्र अशा तीर्थावर बळी चढवणे म्हणजे संविधानिक गृन्हास्पद कृत्य आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या हेमंत सोरेन या मुख्यमंत्र्याने असे करणे अशोभनीय आहे. जैन समाजात चातुर्मास सण पवित्र मानला जातो. या दिवसाच्या पूर्वसंध्याला अशी कृत्य करणे म्हणजे जैन समाजाच्या भावनांना ठेस पोचवणे होय असे यावरून दिसून येते, या घटनेचा संपूर्ण जैन समाज निषेध करत असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर केंद्र सरकारकडून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय जैन सेनेचे ललित गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष. संदीप भंडारी, महामंत्री. यांच्याद्वारे उपविभागीय अधिकारी वरोरा यांचेकडे डॉ. कोटेजा, प्रयास मालू, दिवेस चोरडिया, प्रमोद बोरा, अनिल साकरीया ( माजी नगरसेवक ), विजू बोरा, पवन संचेती तथा अन्य जैन बांधव यांनी केली आहे .