कारंजा : नुकतेच विधानसभा निवडणूकीची घोषणा ज्ञाली असून,स्थानिक कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक रणधुमाळी सुरु होतांना दिसत असून स्थानिक नेत्यांसह या मतदार संघावर डोळा ठेवून असलेल्या बाहेरगावच्या पुढार्यांनी सुद्धा निवडणूकीची तयारी सुरु केली असल्याचे पहायला मिळत आहे. कारंजा शहरात गेल्या तिस वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेल्या डहाके परिवारातील स्व.प्रकाशदादा डहाके यांनी सन 2009 मध्ये या मतदार संघाचे नेतृत्व केले होते.त्यांच्या काळात त्यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळावर निवड होऊन त्यांनी अनेक विकासाची कामे केली. त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थेसह सहकारी संस्थामध्ये सुद्धा चांगलीच पकड होती.त्यांच्या काळातच त्यांनी उप जिल्हा रुग्नालय ; कारंजा वन पर्यटन केंद्र इत्यादी बरीच लोकहिताची कामे करून घेतली.शासन दरबारी त्यांचे वजन होते.दमदार स्थानिक नेते म्हणूनच त्यांचा नावलौकीक होता.परंतु त्यांचे दि.10 मे 2021 रोजी आकस्मिक निधन झाले.मतदार संघाला पोरके करून गेलेल्या स्व. प्रकाशदादाची उणीव त्यांच्या पत्नी सईताई डहाके यांनी भरून काढली.मागील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीमध्ये त्यांनी आपल्या गटाच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती होण्याचा मान सुद्धा मिळवीला.आज स्थानिक सहकारी संस्थामध्ये त्यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.स्व. प्रकाशदादा डहाके यांचे नंतर त्यांच्या कडे कारंजा मानोरा मतदार संघातील स्व.दादांचे कार्यकर्ते आशेने पहात आहेत.व स्थानिक नेत्या म्हणून विधानसभेत त्यांनी उमेद्वारी दाखल करावी अशी आशा बाळगून आहेत.त्यामुळेच त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंगरूळपिर रोडवरील शेतकरी निवास सभागृह येथे दि. 20 ऑक्टोंबर रोजी कार्यकर्ता मेळावा आयोजीत करून आपल्या समर्थकां सोबत विचार विनिमय करून,कारंजा नगरीच्या विकासासाठी स्व. दादांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे सुतोवाच करीत,कार्यकर्ते सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण अशी निवडणूकी संदर्भातील आपली भूमीका स्पष्ट केली.यावेळी त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्याला स्थानिक स्वराज्य संस्था,कृषी उत्पन्न बाजार समिती,खरेदी विक्री संघ,पंचायत समिती सदस्य,ग्राम पंचायत सरपंच सदस्यासह शेतकरी व स्थानिक कार्यकर्त्यांची लक्षणीय संख्या दिसून आली.