वरोरा पोलिस स्टेशन येथे एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्या के प्रयत्न केल्याची घटना 7 ऑगस्ट रोजी घडली. सदर बातमी मनसे नेते राजू कुकडे यांनी भूमिपुत्राची हाक या स्वतःच्या न्युज पोर्टलमध्ये प्रकाशित केली.यात त्यांनी व्यक्तीविशेषच्या नामाऐवजी धर्माचा उल्लेख केला.म्हणून मुस्लिम समाजबांधवांची भावना दुखावली. अशी तक्रार एआयएमआयएम चे मुज्जमिल मजिद शेख यांनी वरोरा येथे नोंदवली. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी राजू कुकडे यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न व गैरजबाबदार बातमीवरून भादंवि 295 (अ) कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
राजू कुकडे वरील आरोप
7ऑगस्ट रोजी खांबाळा येथील महिलेने वरोरा पोलिस स्टेशन परिसरात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत मनसेचे राजु कुकडे रा. वरोरा यांनी भूमीपुत्राची हाक या खाजगी पोर्टलवर टाकून ग्रुपवर व्हायरल केली. असा आरोप आय.ए.आय.एम आय.एम.ने तक्रारीतून केला आहे. याबातमीमध्ये एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीने अत्याचार केला.असे नमूद केले. नामाऐवजी धर्माचा उल्लेख केल्याने त्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.
यावरून धार्मिक तेड निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यावरून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुजम्मिल मजीद शेख यांनी पोलिस तक्रारीतून केली होती. त्यानुसार पोलिसांनी 11 ऑगस्ट रोजी राजु कुकडे यांचे विरोधात भादंवि 295(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.