कारंजा : सद्य स्थितीत हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीमुळे तापमानाचा पारा तिव्रतेने कमी जास्त होत आहे. शिवाय सायंकाळ पूर्वीच थंडगार वारे वहात असून,यामुळे हल्ली सर्दी-पडसे,दमा-खोकला, डोकेदुखी,ताप, हिवताप, टायफाईड,डेंग्यु,रक्तदाब कमी-जास्त होणे असे आजार वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा आजारकडे दुर्लक्ष्य न करता किंवा आजार अंगावर न काढता वेळीच आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करावा. डॉक्टरांच्या तपासणी नंतरच गोळ्या औषध घ्यावे. स्वमनाने कोणत्याही मेडीकल स्टोअर्स वरून अंदाजे गोळ्या औषध घेऊ नये. हातपाय स्वच्छ गरम पाण्याने धुवावेत.कोमट पाणी, सुंठ मिरे तुळस हळद आले यांचा काढा प्यावा.अंगावर स्वेटर, शॉल,कानटोपी, मास्कचा वापर करावा.असे मार्गदर्शन आमचे मुलाखती दरम्यान कारंजा येथील सुप्रसिद्ध समर क्लिनिक, (महात्मा ज्योतिबा फुले चौक कारंजाचे) वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजफ्फर खान यांनी केले असल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.