कारंजा (लाड) : दिवंगत आमदार राजेन्द्रजी पाटणी यांचे सुपूत्र तथा कारंजा येथील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे ललितजी चांडक यांचे जावाई ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी या तरुण,तडफदार,अभ्यासू व्यक्तिमत्वानी आपली कर्मभूमी म्हणून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची सर्वार्थाने निवड केलेली असून, त्यासाठी गेल्या पाच वर्षापासून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात त्यांचा वावर वाढलेला होता असे दिसून येत आहे.सातत्याने ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी हे मतदार संघातील मतदारांशी आपुलकी व प्रेमाने संवाद साधून मतदाराच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेत असतात.विशेष म्हणजे येथील शेतकरी,ग्रामस्थ व सुशिक्षीत बेरोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी कटीबद्ध असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.कारंजेकर व मानोराकरांच्या मागण्याची कटाक्षाने दखल घेतांना दिसून येतात.कारंजा मानोरा मतदार संघाला भाजपामय करण्यात त्यांच्या वडीलांचा राजेंद्र पाटणी यांचा सिहाचा वाटा होता.राजेंद्र पाटणी यांनी तिन वेळा या मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केल्याचे दिसून येत असून त्यांच्या कारकिर्दीत भाजपा पक्ष अपराजित राजकिय पक्ष म्हणून संपूर्ण वाशिम जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे.कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात बऱ्यापैकी विकासात्मक कामे झालेली आहेत.परंतु मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असतांना त्यांच्या अकाली मृत्युमुळे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ नेतृत्वहिन झाल्याचे वाटत असतांनाच त्यांचे सुपूत्र ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी तरुण वयातच स्वतःचे पितृछत्र हरविले असतांनाही हिम्मत न हारता, स्वतःचे दुःख बाजूला सारून, मतदार संघाची सर्वस्वी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.आणि मतदार संघातील प्रत्येक गावखेडे,वस्त्या वाडयांमध्ये संपर्क आणि संवाद ठेवून स्वतःचे जीवन मतदार संघाच्या विकासाकरीता खर्ची करण्याचे ठरविले आहे. भविष्यात येथील शेतकरी, शेतमजूर,कामगार,युवा वर्ग, विद्यार्थी व सुशिक्षीत बेरोजगार यांच्या शिक्षण,रोजगार व विकासाकरीता त्यांनी स्वत: विकास आराखडा तयार केला आहे.भाजपा पक्षात पक्षश्रेष्ठी, अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तथा उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या कडे त्यांच्या वडीलांबद्दल दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विषयी,विशेष आदराचे स्थान होते व आजही आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांची उमेद्वारी जवळ जवळ 100% पक्की मानली जात असून, त्यांना पक्षाची उमेद्वारी मिळाल्यास ते विजयश्री खेचून आणून निश्चितच संधीचे सोने करतील असा आमचा विश्वास आहे.शिवाय दिवंगत आमदार राजेंद्रजी पाटणी यांच्या मृत्युनंतरची सहानुभूती त्यांच्या मागे आहे.हा त्यांच्या सोबत असणाऱ्या तरुण,ग्रामस्थ, शेतकरी मतदाराचा कौल स्पष्टपणे त्यांचे सोबत दिसत असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी आपल्या सर्वेक्षणातून स्पष्ट केले आहे.