अकोला:-
वर्ष 2006 च्या 31 डिसेंबर च्या रात्री घडलेल्या एका प्रसंगाने प्रभावित होऊन, चिंतीत होऊन डॉ. आर. बी. हेडा, श्री नंदूजी देशपांडे, श्री महेश जोशी एकत्र आले आणि येथूनच अकोला येथे हिंदु नव वर्ष शोभायात्रेचा जन्म झाला. त्यावेळेस पासून सातत्याने डॉ हेडाजी, नंदूजी देशपांडे, महेश जोशी, प्रशांत पाटील, सौ. इंद्रायणी देशमुख, सतत कार्यरत आहेत. आज अठरा वर्षे झाली, शोभायात्रेचे रुप, स्वरूप, प्रभाव सातत्याने बदलत आहे, वाढत आहे.
सुरुवातीच्या काळात छोट्या स्वरूपात चालू झालेली शोभायात्रा आता विराट स्वरूप घेत आहे. नुसते भारतीय, हिंदु संस्कृतीचा राग आलाप न करता , जुन्या गोष्टी न उगाळता आपली संस्कृतीचे जतन, संवर्धन व वृद्धिंगत कशी होईल, याचा विचार सातत्याने संस्कृती संवर्धन समिती, अकोला करत असते. काळानुरूप शोभायात्रा भव्य होत गेली. स्वरुपात थोडा फार बदल आवश्यकते प्रमाणे होत गेला. वाहन रँली, मंदिरांना ध्वज प्रदान करणे, मार्गावरील प्रमुख पुतळयांना माल्यार्पण करणे, ठिकठिकाणी स्वागत करणे, अग्रभागी रामरथ असणे, शहरातील अनेक प्रमुख मंदिरांना भेट देत, बिर्ला राम मंदिरात समारोप होत असतो.
संस्कृती संवर्धन समिती सातत्याने प्रवाही राहत आलेली आहे. शहरातील अनेक गणमान्य नागरिक, राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांचा सहभाग राहत आला आहे. मा. श्री नंदुजी देशपांडे व मा. श्री गोपालजी खंडेलवाल यांच्या दिशादर्शना खाली समिती कार्यरत आहे.
संस्कृती संवर्धन समिती चे अध्यक्ष म्हणून श्री. नितीन बाठे सर तर कार्याध्यक्ष म्हणून श्री. हरीशभाई आलीमचंदानी व स्वागताध्यक्ष श्री. पुरुषोत्तमजी मालानी, उपाध्यक्ष श्री.निकेशजी गुप्ता, श्री. निलेशजी देव, श्री. अभयजी बिजवे, श्री. नंदकिशोरजी आवारे, श्री. मनिषजी चंदानी, श्री. अशोक पाध्ये, श्री. विनोदजी देव, श्री. आनंदजी बांगड, संयोजक विनोद जकाते सहसंयोजक स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, सौ. सोनल ठक्कर, सौ. रश्मी कायंदे, मीनाक्षी आपोतीकर यांच्या कडे महिला संयोजक म्हणून जबाबदारी आहे. मुख्य मार्गदर्शक डॉ. हेडा सर महेश जोशी, ध्वज वितरण व मंदिर संपर्क प्रशांत पाटील, पंकज सादराणी यांच्या कडे आहे. प्रचार व प्रसार, भव्य रांगोळ्या, सजावट समीर थोडगे पहात आहे. मार्ग स्वागत व साफसफाई निलेश देव तर मिडिया संपर्क स्वानंद कोंडोलीकर यांच्या कडे आहे. रामरथ सजावट प्रशांत पाटील कडे आहे. तसेच फेटे बांधणे, चहा नाश्ता, थंड पेय, विविध परवानगी, ढोल ताशे, साऊंड सिस्टीम, फटाके व आतिषबाजी, पुष्पहार, पुष्पवृष्टी, लेझीम पथके, पाणी व्यवस्था, रामरक्षा म्हणणे, भजन, किर्तन व्यवस्था, अनेक जण साभांळत आहे. या व्यतिरिक्त अनेक व्यवस्था अनेक जण हिरहीरीने सहभाग घेऊन सांभाळत आहे.
समाजातील धर्म व राष्ट्रप्रेमी दानशूर नागरिकांच्या भक्कम पाठीब्या मुळे व आशीर्वादाने ही नव वर्ष स्वागत यात्रा यशस्वी होत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे श्रीराम नवमी शोभायात्रा समाजाचा उत्सव झाली आहे. त्याच प्रमाणे नववर्ष स्वागत यात्रा सुद्धा हळूहळू हिंदू जगे विश्व जगे या उक्ती प्रमाणे समाजाचा उत्सव होत आहे.
अशा या नव वर्ष शोभायात्रा यशस्वी करण्यात सगळे सरसावले आहे. सर्वांना आवाहन करण्यात येते की, भारतीय संस्कृती संवर्धनासाठी तमाम जनतेने या मध्ये सहभागी व्हावे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....