कारंजा : सविस्तर वृत्त असे की गाडी क्रमांक MH20 EE7879 मुंबईवरून नागपूरकडे जात असलेल्या मर्सिडीज कारचा अपघात. लोकेशन समृद्धी महामार्ग 187 वर घडला. सदर चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे हा अपघात घडला. अपघाताची माहिती तात्काळ टिव्ही 9 चे पत्रकार विठ्ठलभाऊ देशमुख यांनी तात्काळ माहिती श्री गुरु मंदिर रुग्णवाहिक रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यांनी तात्काळ लोकेशन समृद्धी महामार्ग 108 पायलट विधाता चव्हाण यांना माहिती दिली. पायलट विधाता चव्हाण व डॉक्टर बी एस राठोड सर यांनी तात्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका सह धाव घेतली. मर्सिडीज चा अपघात हा भीषण होता पण. सुदैवाने मर्सिडीज कार मधल्या एअरबॅग उघडल्यामुळे चालक व मालकाला किरकोळ जखमी झाले आहेत. त्याचे नावे सुरेश यादव शानवाज शहबाज त्यावेळी कारंजा लोकेशन HSPटीम पी एस आय मधुकर राठोड सर पोलीस कॉन्स्टेबल एस सी नवलकर व फायर टीम वैभव जाधव शुभम चव्हाण आजेश राठोड धम्मदीप सूर्यवंशी व MSF भूषण नवताळे अवगण साहेब व गौरव टीम हे घटनास्थळी मदतीसाठी प्रामुख्याने हजर होती.