वाढत्या कॅन्सर आजाराला आळा घालण्यासाठी, वर्षभरात किमान 300 रुग्णांचे प्राण वाचविण्याचे ध्येय पुढे ठेवून सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून प्रगत तंत्रज्ञान युक्त राज्यातील पहीले अत्याधुनिक, कॅन्सरचे निदान फिरते हाॅस्पिटल जनतेच्या सेवेत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने समर्पित करण्यात आले आहे.
या फिरत्या कॅन्सर तपासणी हाॅस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबिर 1 आॅगस्ट रोजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांच्या सहकार्याने ब्रम्हपुरी शहरातील हनुमान, गांधीनगर प्रभाग येथे घेण्यात आला. यावेळी या दोन्ही प्रभागातील शेकडो रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली.
सदर तपासणी शिबीराला प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ.नितीन उराडे, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेविका निलीमाताई सावरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रिकांत कामडी, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी यांची उपस्थिती होती.
तपासणी शिबिराच्या यशस्वितेसाठी जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, शिबीर समन्वयक राहुल मैंद, राहुल सातपुते, रविंद्र पवार, सुरेश वंजारी, अमोल सलामे यांनी सहकार्य केले.
सदर कॅन्सर तपासणी शिबीर उद्या दि. 2 ऑगस्ट ते 4 आॅगस्ट व 7 आॅगस्ट रोजी ब्रम्हपुरी शहरातील राजीव गांधी सभागृह येथे व 8 आॅगस्ट रोजी शहरातील पेठवार्ड येथील जिल्हा परिषद शाळा क्रं.2 जवळ आयोजित करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....