"जगत्कल्याण आणि स्वस्थ सुखी समाज आध्यात्मिक सशक्तीकरणाकरीता, पत्रकारांची भूमिका" या विषयावर,प्रजापिता ब्रम्हकुमारीज विश्वविद्यालय मिडिया विंग,आनंद सरोवर,शांतीवन,आबू रोड (राजस्थान) द्वारा दि २६ सप्टेंबर २०२४ ते दि. ३० सप्टेंबर २०२४पर्यंत "राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनाचे" महाआयोजन करण्यात आलेले असून सदहू पत्रकार महासंमेलनाला विद्यमान राष्ट्रपती ब्र.कु.द्रोपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.सदहू कार्यक्रमाला संपूर्ण भारत देशामधून हजारो पत्रकार, संपादक, प्रकाशक, रेडीओ, दुरदर्शन,इलेक्ट्रॉनिक्स मिडीया संवाददाता सहभागी होणार असून,त्यांचा मार्गदर्शन व सहविचार परिसंवाद होणार आहे. या पत्रकार महासंमेलनाकरीता, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय कारंजा (लाड) च्या संचालिका ब्रम्हकुमारी मालती बहनजी यांच्या मार्गदर्शनात,वाशिम जिल्ह्याचे कारंजा (लाड) येथील पत्रकार सोबत गाईड म्हणून असलेल्या ज्येष्ठ पत्रकार अशोकराव उपाध्ये गुरुजी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा,महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, पत्रकार लोमेश पाटील चौधरी,विजय खंडार,सुधाकर इंगोले (अकोला),गजानन हरणे, संजय गावंडे,शंकरराव पुंड इत्यादी पत्रकार मंडळी दि.२४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्रीच्या पुरी-अजमेर सुपरफास्ट एक्स्प्रेसने रवाना झाले असून त्यांना रवाना करण्यासाठी बडनेरा रेल्वे स्थानकावर ब्रम्हकुमार प्रदिप वानखडे,गोलू पाटील लाहे; नकुल पाटील उपाध्ये; योगेश उपाध्ये, दुष्यंत चौधरी इत्यादी हजर होते.