ब्रम्हपुरी शहर हे फार पूर्वीपासून नैसर्गिकदृष्टीने एक संपन्न शहर म्हणून ओळखले जाते.हे क्षेत्र निसर्गाच्या सानिध्यात आहे.शहरामध्ये विविध भागात तलाव असून त्यांच्या संवर्धनाची,स्वच्छतेची जबाबदारी येथील प्रशासन त्याबरोबरच नागरिकांची सुद्धा आहे.म्हणून पेठवार्ड येथील असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरणं व सुशोभीकरण करीता आवश्यक निधी उपलब्ध करून दयावे अशी मागणी पेठवार्ड येथील जनतेच्या वतीने सुरज मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस ब्रम्हपुरी ने मा.पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून या प्रभागाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे म्हणून हा प्रभाग शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा पासून वंचित दिसून येतो.म्हणून या भागाचा विकासासाठी स्थानिक लोकांनी पुढाकार घेतला असून या भागात असणाऱ्या तलावाचे सौंदर्य करून या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध होणे गरजेचे आहे.तलावाची साफ सफाई नसल्याने येथील मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसून येते त्यामुळे या परिसरात रोगराई पसरु शकते याची शक्यता नाकारता येत नाही.याचा त्रास नागरिकांना होत आहे.तलावाचे सौंदर्यकरण झाले तर या परिसराला छान नवे स्वरूप येईल, येथील नागरिकांना फिरायला,बसायला,करमणूक, विरंगुळा करीता जागा मिळेल.हा परिसर छान स्वच्छ दिसेल.सोबतच या परिसरात नवीन मल्टिप्लेक्स टॉकीज,नवीन उपहारगृह,वाचनालय,ओपन जिम,गार्डन यासारख्या आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.त्यामुळे या वार्डाच्या विकासाला गती मिळेल.म्हणून येथील लोकांनी या वार्डातील तलावाच्या सौंदर्यकरणासाठी आवश्यक पुरेसा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सुरज मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस ब्रम्हपुरी कडून मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार,आमदार तथा पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.