वार्षिक पुष्प प्रदर्शन शनिवार,रविवार दिनांक २८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी खंडेलवाल भवन येथे आयोजित करण्यात येत आहे.
या दोन दिवसात अकोलेकरांना विविध रंगीबिरंगी व आकर्षक फुलं व झाडं बघायला मिळणार असून, सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक असे इन डोअर प्लांट सुद्धा अकोलेकरांना बघायला मिळतील.
मागील ५० वर्षापासून अकोला गार्डन क्लब तर्फे वार्षिक पुष्प प्रदर्शनी चे आयोजन करण्यात येत आहे. या संस्थेचे हे ५१ वे वर्ष असून, काहीतरी विशेष देण्याचा प्रयत्न आयोजकांतर्फे केल्या जाणार आहे.
दरवर्षी अकोलेकर या पुष्पप्रदर्शनीला अगदी भरभरून प्रतिसाद देतात. तसाच प्रतिसाद यावर्षी सुद्धा अपेक्षित आहे. या वर्षी बऱ्याच नवनवीन संकल्पना घेऊन अकोला गार्डन क्लब अकोलेकरांच्या सेवेत दाखल होत आहे. हे पुष्प प्रदर्शन संपूर्ण अकोलेकरांसाठी खुले आहे.
जर पुष्प प्रदर्शनात कुणाला भाग घ्यायचा असेल तर गुरुवार २६डिसेंबर रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ८ या वेळेत आपले नाव नोंदणी खंडेलवाल भवन येथे करावी
अकोला गार्डन क्लब व महाबीज
द्वारे आयोजित वार्षिक पुष्प प्रदर्शनाचा लाभ, अकोला जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अकोला गार्डन क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.