नागभीड तालुक्यातील बिकली या गावातील रहिवासी असलेले अजिंक्य कुमरे व साहिल पंधरे हे कांपा येथील शाळेत शिकत आहेत. शाळेच्या सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. त्यासाठी हे दोघेही विद्यार्थी शाळेत जात असतांना वाटेत त्यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या ब्रम्हपुरी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र दोन्ही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वैद्यकीय उपचार करतांना त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचण निर्माण झाली होती.
सदरची बाब काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी आपल्या कडून सदर शाळकरी मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देतांना ब्रम्हपुरी येथील पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, राहुल मैंद, बबलू मडावी हे यावेळी उपस्थित होते.