कारंजा : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) आजच्या आधुनिक युगात विज ही जीवनावश्यक गरज झालेली असून, अगदी स्वयंपाकघरा पासून तर शाळा, कॉलेज, इस्पितळे(रुग्नालय), लहान मोठे उद्योग धंदे विजेवरच अवलंबून आहेत.आज जर रात्रीच्या वेळेला विज नसली तर रुग्नालयातिल रुग्न,लहान मुले व प्रत्येक व्यक्ती समोर महाभयंकर काळोखाचे संकट उभे ठाकते. त्यामुळे १००% विजेचा भरणा इमाने इतबारे करणाऱ्या नागरिकांना विद्युत पुरवठा केव्हाच खंडीत होऊ नये असे वाटत असते. व समजा तांत्रिक अडचणीने विद्युत पुरवणा खंडीत झालाच तर त्याची पूर्वसूचना देऊन त्वरीत सुरु होण्याची अपेक्षा असते.सध्या पावसाळ्याचे दिवस असून, बरेचदा वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असून याचा प्रत्यय ग्रामीण व शहरी नागरीकांना येत आहे.परंतु याची कल्पना काही व्यक्ती आमदार राजेंद्रपाटणी यांचे निकटवर्ती खंदे समर्थक भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे यांना फोन करून देतात.व लगेच राजीव भेंडे हे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगून त्वरित विद्युत पुरवठा करण्यास सांगून ,नेहमी नेहमी विद्युत पुरवठा बंद का होत आहे ? याचे कारण शोधण्यास सांगतात. नुकताच याचा अनुभव प्रसाद देशमुख यांना आला असून, उपअभियंता देशपांडे सरांनी त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला आहे.याचे श्रेय राजीव भेंडे यांना देत त्यांनी त्यांचे आभार मानले आहे.