कारंजा : येथून जवळच असलेल्या "इंझा - वनश्री"येथील, ग्रामपंचायत सदस्य तथा साप्ताहिक युवा प्रेरणाचे संपादक, उत्कृष्ट समाजसेवी तरुण - गणेश बागडे यांच्या समाजसेवी कार्याची जाण ठेवून महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे तथा "गावाकडची बातमीचे"वार्ताहर दामोधर जोंधळेकर यांनी गणेश बागडे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे गावी उशीरा रात्री जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व अभिनंदन केले . तसेच यावेळी बोलतांना संजय कडोळे म्हणाले की, ग्रामीण भागात वास्तव्य करणारा तळागाळातील पत्रकार हा लोकशाही व्यवस्थेचा खरा पाया असल्यामुळे, अशा पत्रकारांना प्रोत्साहन देत पुढे आणल्यास, समाज व्यवस्थेला न्याय देणे होय . आणि त्यामुळे आपली संघटना सर्वप्रथम ग्रामीण भागातील तळागाळातील पत्रकार व समाजसेवी कार्यकर्त्याना जास्त महत्व देते ." बागडे यांच्या कुटूंबीयांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे आभार मानले .