वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिमच्या वतीने दरवर्षी संविधान गौरव दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
संविधान स्विकृती दिवस सबंध भारतीयांसाठी एक आनंदाची पर्वणी आहे.
वाशिम शहरात संविधान स्विकृती दिवस, संविधान गौरव दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा सन 2000 पासुन सुरू केली आहे त्यांचे हे 24 वे वर्ष आहे.
वाशिम शहरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान गौरव रॅली काढण्यात येते या मध्ये सर्व जाती धर्माचे लोकशाहीर,कलाकार व हरिभक्तपरायण,किर्तनकार आदी मंडळी संविधानावर आधारित पोवाडे,अभंग,गिते व संविधानाचा जयघोषात भव्य दिव्य रॅलीचे आयोजन सव्विस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता निघणार आहे,समारोप भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करून होणार आहे. संविधान गौरव दिन मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. सहभागी सर्व कलावंत ह.भ.प किर्तनकार यांना मुकनायक विचार मंचाचे वतीने संविधान प्रास्ताविका व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सर्व जनतेनी व कलाकारानी आपापल्या वेशभूषा करून टाळ मृदंग व वाद्यासह उपस्थित रहावे असे आवाहन पी. एस. खंदारे , डॉ.रामकृष्ण कालापाड,राजू दारोकार, सुखदेव काजळे, विजय शिंदे, महेश देवळे, निलेश भोजणे, कुसुम सोनुने,अजय सोनुनकर, दतराव वानखेडे, नाजूकराव भोंडणे, महा अंनिस व मूकनायक विचार मंचाच्या वतीने केले आहे.