अकोला: - जंगले, पशु, पक्षी हे निसर्गाचे वैभव आहेत. आपल्याला माणसापेक्षा जंगलातील पाखरांचा सहवास अधिक आनंद देऊन जातो असे भावोद्द्गार निसर्ग लेखक व संमेलनाध्यक्ष सुरेशचंद्र वारघडे यांनी केले.
अकोला जिल्हा मराठा मंडळ व वनराई अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय वनराई बालकुमार साहित्य संमेलनात बोलत होते. आमदार रणधीर सावरकर यांचे हस्ते वृक्ष व ग्रंथ पूजन तसेच पद्मविभूषण डॉ.मोहन धारिया यांच्या फोटोचे पूजनाने झाला.
याप्रसंगी महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ, वनराईचे सचिव व संपादक अमित वाडेकर पुणे, उद्योजक प्रशांत देशमुख ,स्वागताध्यक्ष प्रा. नितीन बाठे, सौ.निर्मला वारघडे,अमरावती विभाग प्रमुख मधुभाऊ घारड,मांगीलाल महाले नाशिक, डॉ.विजय निलावार हिंगोली, एडवोकेट नारायण सोमवंशी लातूर,मराठा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, महादेवराव भुईभार,डाॅ. विनोद बोर्डे,प्रा.विवेक हिवरे,संमेलनाचे संयोजक बबनराव कानकिरड यांची विचारपीठावर उपस्थिती होती.
पर्यावरण रक्षणाचे काम वनराईचे कार्यकर्ते जीवाभावाने करत आहेत. वनराई बालकुमार साहित्य संमेलनातून चांगला सकारात्मक विचार समाजापर्यंत पोहोचला पाहिजे असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या विचारांना कृतिशील अभिवादन करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन प्रा. नितीन बाठे यांनी केले.
डाॅ.रणजीत सपकाळ
पर्यावरण रक्षणासाठी मुलांमध्ये जगराज जनजागृती करण्यासाठी वनराई बालकुमार साहित्य संमेलन संमेलनाचे आयोजन अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉक्टर रणजीत सपकाळ यांनी केले डॉक्टर विजय निलावार निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनीकरणाचे जन आंदोलन करण्यासाठी पद्मविभूषण डॉक्टर मोहन धारिया यांनी वनराई चळवळ सुरू केली हे संमेलन त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी महिलाचा दगड ठरल्याचे प्रतिपादन डॉक्टर विजय निलावार हिंगोली यांनी केले मधु घारड प्रत्येकाने निसर्ग साक्षर होण्याची गरज आहे आजचे संमेलन त्या निर्धाराचे पहिले पाऊल असल्याचे प्रतिपादन पण राहायचे अमरावती विभाग प्रमुख मधून गारडे यांनी केले
लिटिल स्टार कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. तर कवी रामराव पाटेखेडे यांनी स्वरचित संमेलन गीत सादर केले.
प्रास्ताविक बबनराव कानकिरड यांनी केले. संमेलनाध्यक्षांचा परिचय आदित्य दामले यांनी करून दिला. संमेलनात शालेय विद्यार्थी हिरवा गणवेशात परिधान करून वनराईमय झाले होते. संमेलनाची सुरुवात वृक्ष व ग्रंथ दिंडी पूजनाने झाली. बोथाकाजी येथील गुरुकुंज कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी दिंडी पथकामध्ये सहभागी झाले होते. ग्रंथदालनातील देशभरातील नद्यांचे सागर गोट्याचे प्रदर्शन, वनराई प्रकाशनाचे पर्यावरण ग्रंथदालन , पर्यावरण मित्र उत्कर्ष जैन यांची पर्यावरण प्रदर्शनी, निसर्गोपचार केंद्राचे खादी वस्त्र व ग्रामोद्योग वस्तूंचे प्रदर्शन आकर्षक ठरले.उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सौ. मीनाक्षी पाटील यांनी केले.
दुसरे सत्र
बालकुमारांचे कवी संमेलन संपन्न झाले. या सत्राचे सूत्रसंचालन कवी आतिश सोसे , विधी अनिल पालवे यांनी केले. समर्थ कॉन्व्हेंट ,मैनाबाई ढोणे विद्यालय आडसूळ ,महात्मा गांधी विद्यालय गांधीग्राम,प्रभात किड्सचा सृजन बळी यांनी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. बहिणाबाई ढोणे विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी सातपुड्याच्या निसर्ग कविता सादर केल्या. कवी किशोर बळी यांनी कविता सादर करून रसिकांचीमने जिंकली.
"लेखक आपल्या भेटीला"या सत्रात लेखिका प्रा.डॉ.दिपाली अतिश सोसे यांची प्रकट मुलाखत समर्थ ज्ञान संकुलाच्या कु. भक्ती सावरकर व गार्गी परनाटे यांनी घेतली . या सत्राचे संयोजन सागर उकर्डे व संदीप देशमुख यांनी केले. तिसऱ्या सत्रात पद्मविभूषण डॉक्टर मोहन धारिया वक्तृत्व करंडक स्पर्धेत
शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
समारोप सत्रात अमरावती विभाग प्रमुख मधुभाऊ घारड यांनी वनराई संदेश देताना म्हटले की झाडे वाचवा नाहीतर विनाश अटळ आहे. कुणाची लावा लावी करण्यापेक्षा जागोजागी झाडे लावा. कुणाचा मार्ग अडवण्यापेक्षा नदी नाले अडवून जमिनीत पाणी मुरवा. कुणाची जिरवात बसू नका त्यापेक्षा जलसंधारण करा .
आपल्या देशभरातील नद्यांचे सागर गोट्यांचे संकलन करणारे साहेबराव पाटील तायडे यांचा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी गौरव केला. वनराई प्रकाशन ग्रंथ दालनाच्या प्रमुख पूर्वा कुबेर यांचा पर्यावरण वाहिनी प्रमुख डॉ. सौ ज्योत्स्ना कानकिरड यांनी शाल,श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ञ संचालक प्रा. डॉ. संजय खडक्कार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.संतोष आंबेकर, प्रकाश अंधारे यांची समायोचित भाषणे झाली.
गजानन चौधरी,गजानन वाघ, लक्ष्मणराव घुमारे,विजय कौसल, भाई दिनेश काटोके, डॉ. अविनाश गावंडे सुभाष पुंडकर ,कवी मोहन शिरसाट,श्रीकृष्ण विखे,अरुण बढे, दिवाकर पाटील, संजय सरप,रवी मानकर,पंकज देशमुख, डॉ. विनीत हिंगणकर, दीपक आखरे, काशिनाथ दाते, गोवर्धन दादा खवले ,अनिल पालवे ,प्रा.मोहन खडसे, प्रा. मोनिका शिरसाट, प्रा. स्वप्नील इंगोले,डाॅ.शीतल गावंडे,प्रा. सुमित जोशी,विजय ठोकळ, प्रशांत काळे, महेंद्र पाटील , वसंतराव केदार ,वसुंधरा पाटील, प्रा. धनंजय पटोकार ,केशवराव मालोकार,प्रशांत लोडम यांचेसह सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....