ब्रम्हपुरी
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण ब्रम्हपुरी तालुक्यातील जवरबोडी मेंढा येथे १९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभ दिनी छत्रपती शिवाजी महाराज युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या प्रसंगी करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण लोकमत चंद्रपूर जिल्हा भुषण पुरस्कार प्राप्त माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने जवरबोडी मेंढा गाव दुमदुमून गेले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अरुण शेंडे अध्यक्ष तालुका भाजपा ब्रम्हपुरी, यशवंत आंबोरकर संचालक कृ.उ.बा.स.ब्रम्हपुरी, देवराव उईके सरपंच जवरबोडी मेंढा, काशिनाथ थेरकर माजी जि. प. सदस्य, विवेकानंद थेरकर उपसरपंच जवरबोडी मेंढा, चरण थेरकर अध्यक्ष तं.मु.स., मायाबाई थेरकर ग्रा.पं.सदस्या, गीताबाई मसराम ग्रा.पं.सदस्या, सपनाबाई भुझाडे ग्रा.पं.सदस्या, बनसोड सर मुख्याध्यापक जि.प. शाळा जवरबोडी मेंढा, बांगरे सर, लिंगायत सर, सुधाकर मडावी माजी सरपंच, श्यामराव राणे माजी ग्रा.पं.सदस्य, लोकेश सिडाम रोजगार सेवक, किशोर थेरकर, विलास उईके, तामदेव थेरकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
_छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी प्रमोदभाऊ चिमुरकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रत्येक देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराजांचा हा पुतळा गावातील प्रत्येक नागरिकांना कायम ऊर्जा देण्याचे काम करेल, शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. असेही मत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....