वाशीम
रथसप्तमी निमित्ताने भव्य यात्रा महोत्सव नाथ नगरी श्रीक्षेत्र डव्हा येथे श्रीनाथ नंगे महाराज सार्वजनिक वाचनालय डव्हा व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते गाडगेबाबा फेम प्रबोधनकार पी.एस.खंदारे यांच्या विशेष कला कौशल्यातून उत्कृष्ट प्रबोधनात्मक राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित, कुटुंब नियोजन, साक्षरता अभियान, स्वच्छता अभियान, बेटी पढाव बेटी बचाव, अंधश्रद्धा निर्मूलन, मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार उद्घाटन मालेगाव तहसीलचे निवासी नायब तहसीलदार सुरज सागर यांच्या हस्ते, कार्यक्रमाध्यक्ष ग्रंथालयाचे संस्थापक अनिल बळी, प्रमुख अतिथी म्हणून परिवर्तन कला महासंघाचे शेषराव मेश्राम, झी टीव्ही चे प्रतिनिधी गणेश मोहळे,डव्हा ग्राम पंचायतचे माजी सरपंच संदीप डिघोळे, तसेच तमाम यात्रे करूच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी सर्वप्रथम कर्मयोगी संत गाडगेबाबा व संत सावता माळी यांच्या प्रतिमेचे पूजन करून हवेत तरंगणाऱ्या आधांतरी बाबांच्या पायाखालची खुर्ची काढून व फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विचारपीठावरील मान्यवरांनी प्रस्तुत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला रितसर सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राध्यापक सविता अनिल बळी यांनी तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सौ कुसुमताई यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते गाडगे बाबा फेम प्रबोधनकार पी.एस.खंदारे आणि त्यांच्या संचातील शाहीर दत्ता वानखेडे, हार्मोनियम वादक मधुकर ताजणे,नाल वादक नामदेव आवटे, खंजिरी वादक कुसुम सोनुने, शेषराव मेश्राम आदी मान्यवरांनी सतत तीन तास यात्रेकरूंचे प्रबोधन केले असून त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन विविध दृष्टांत व प्रयोग सादरीकरण व स्पष्टीकरण, अंधश्रद्धेतून होणारी फसवणूक, तसेच विविध शायरी गीतांचा आस्वाद यात्रे करू भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात घेतला.
हवेत तरंगणाऱ्या अधांतरी बाबाच्या भूमिकेत विदर्भ पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सोमेश अनिल बळी, हजारो भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशिनाथ नागरे,लक्ष्मण गिऱ्हे, ग्रंथपाल सविता गवळी, सुचिता मुधमाळी, कु.रश्मी गुप्ता, सौ.एकता लाचुरे आदींनी अथक परिश्रम घेतले.
खिचडी व चहा पाणी वाटपाणे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....