ब्रह्मपुरी/ प्रतिनिधी:- श्री गुरुदेव आत्मानुसंधान भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे कर्मयोगी परमपूज्य तुकारामजीदादा गीताचार्य यांचा 16 स्मृतिदिन दि.08 ते 11जून 2022रोजी आत्मानुसंधान भू-वैकुंठ अड्याळ टेकडीचे संचालक तथा मार्गदर्शक आदरणीय सुबोधदादा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम दि.8 जून ते दि11जून2022 सकाळी-10वाजता पासून मौन साधना शिबिर, कार्यकर्ता संकल्प अहवाल ग्राम आरोग्य कार्यशाळा महिला कार्यकर्ता मेळावा व गुरुदेव सेवा मंडळ तत्वज्ञान कार्यकर्ता संमेलन कथा मेळावा व अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून आत्मानुसंधान भूवैकुंठ टेकडीचे संचालक तथा मार्गदर्शन आदरणीय सुबोधदादा , हभप उरकुडे महाराज भंडारा, डाँ. शिवनाथजी कुभारे गडचिरोली, अँड. गोविंदराव भेडारकर ब्रह्मपुरी, माजी प्राचार्य देवीदास जगनाडे ब्रह्मपुरी ,माजी प्राचार्य संजय सिंग ब्रह्मपुरी, वैद्य गुरुजी अशोकराव धामणे डॉ. धनलाल शेंद्रे ,डॉ. प्रमोद माडवे ,डॉ. शालिकराव मैद, डॉ. गिरीश शेंडे सौ. जोशनाताई पात्रीकर नागपूर,सौ. बेबीताई काकडे आंबोली ,सौ.अमिताताई मडावी गडचिरोली ,माधुरीताई नखाते मोखारा, सौ. अलकाताई शास्त्रकार, पूनम बगमारे पाहणी ,श्री प्रवीणभाऊ राऊत केंद्रीय अध्यक्ष पोलिस समन्वय समिती नागपूर ,हिरालाल खोब्रागडे आजगाव , लालचंदजी नखाते मोखारा,मुनेश्वर दिवटे मादेड ,किशोरभाऊ तिडके पोलीस पाटील चौगाणं, रामतीर्थजी भुरे चीचाळ इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .