राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपुर,माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद वाशिम, जिल्हा मुख्याध्यापक संघ वाशिम, जिल्हा व जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विद्यार्थ्याकरिता जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम येथे सकाळी 11:30 वाजता करन्यात आले होते.त्यामध्ये वाशिमच्या ऋतुजा व कारंजाच्या अथर्वची विभागीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्या करीता निवड झाली आहे.
सदर मेळाव्याला अध्यक्ष म्हणून राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिमच्या स्वाती कुलकर्णी तर प्रमुख अतिथि म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे जगदीश करडे व शिवशंकर मोरे, विज्ञान अध्यापक मंडळाचे विजय भड,उपमुख्याध्यापिका शिला वजीरे,राजेश ढाकरके,अजय मोटघरे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावर्षीच्या विज्ञान मेळाव्याचा विषय भरड धान्य-एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम? हा आहे. या विषयावर स्पर्धेत जिल्ह्यातील 15 विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी 2 विद्यार्थ्यांची निवड होऊन ते विभागस्तरा करीता पात्र झाले आहेत.त्यामध्ये राणी लक्ष्मी बाई कन्या शाळा वाशिमची ऋतुजा माधव गोटे हिचा प्रथम व आर जे चवरे हाइस्कूल,कारंजाचा अथर्व सुनील ठाकरे यांचा व्दितीय क्रमांक तर श्री शिवजी विद्यालय मोपची,आरती सोनुने व भायजी महाराज पिंपलखुटा च्या यश फुके यांना प्रोत्साहन पर पारितोषिक दिले. सदर विद्यार्थी अमरावती विभागस्तरित विद्यार्थी विज्ञान मेळाव्या करीता निवड झाली आहे.
सदर मेळाव्याच्या समरोपिय कार्यक्रमात विभागस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा प्रमानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनिल धुमकेकर व ज्ञानेश्वर वाकुडकर उपस्थित होते.समरोपिय बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचलन कु.रागिणी दातार तर आभार मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी यांनी मानले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वी साठी अमोल काटेकर, मंगेश जोशी,बंडू टापरे व विज्ञान अध्यापक मंडळाचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.