अकोला : शिवसेना प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त,अकोला येथील मातृत्व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहर समन्वयक अकोला,सौ.पूजा आणि त्यांचे पती मनोज मालोकार राहणार - गीतानगर अकोला,यांनी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय अकोला या ठिकाणी स्वतः जाऊन मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला असून तसे प्रतिज्ञापत्र भरून दिले आहे, त्यांचा ह्या निर्णयामुळे, त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, आजच्या धकाधकाची जीवनात प्रत्येक व्यक्ती तळहातावर प्राण घेऊन दिनचर्या पूर्ण करीत असल्याने मनुष्य जीवनाचे केव्हा काय होईल ? केव्हा मृत्यु कवटाळेल ? हे कुणीच सांगू शकत नाही मात्र आपल्या मृत्युपरांत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत होऊन आपला नश्वर देह सार्थकी लागावा.असे त्याचे प्रांजळ मत आहे. आज तर आपण समाजसेवेत कार्यरत आहोतच परंतू मेल्यानंतर सुद्धा समाजाच्या कामी आलो पाहिजे. असा पूजा आणि मनोज मालोकार यांचा निर्णय आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. परंतु त्यांच्या मते आजकालची मुले हे पुढे चालून उच्चशिक्षित झाल्यानंतर आई-वडिलांचा सांभाळ करतील असं वाटत नाही.त्यामुळे किमान मृत्युनंतरही आपला देह समाजाच्या कामात यावा.असे त्यांचे सुविचार आहेत,आपल्या देहदानामुळे,कोणालातरी आपल्या अवयवांचा उपयोग होऊन जीवदान मिळावे.यापेक्षा दुसरं पुण्य नाही असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांचेशी बोलतांना सौ.पूजा मालोकार यांनी सांगितले आहे. त्या शिवसेना (उभाठा) पक्षाच्या अकोला शहर समन्वयक असून उद्धव ठाकरे यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जात असून त्यांच्या देहदानाच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.