आशा व गटप्रवर्तकांचा १८ ऑक्टोबर पासून बेमुदत संप सुरु*
-----------------------------------
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक आयटकच्या आवाहनानुसार दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ पासून आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला असून अकोला व राज्यातील हजारो आशा वर्कर व गटप्रवर्तक आयटक राज्य कोंसिल सदस्य कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र समोर आंदोलन मा. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना निवेदन देवुन सुरू करण्यात आले आहे.
*आशाताईंना ऑनलाइन कामासाठी शक्ती केली जाते ऑनलाईन काम करण्यासाठी कुठलेही साधन साहित्य दिलेले नाही त्यामुळे शक्ती करणे हा कायद्याने गुन्हा आहे याबाबत राज्य स्तरावर चर्चा करण्यात आली होती व त्यात आशा वर्कर यांना ऑनलाईन कामासाठी शक्ती करण्यात येऊ नये असा सामूहिक निर्णय झालेला होता तरीपण दडपशाही सुरूच आहे* अशी माहिती आयटक संलग्न आशा कर्मचारी संघटना जिल्हासचिव मायावती बोरकर यांनी दिली.
मा. वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
मागण्या : १) आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देवून वेतन श्रेणी लागू करा. तोपर्यंत आशांना दरमहा १८०००/- रु. व गटप्रवर्तकांना २५००० रु. मानधन देण्यात यावे.
२) १० एप्रिल २०२३ शासन निर्णयाप्रमाणे आशा व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात एप्रिल २०२३ पासुन १५०० रु.वाढ करण्यात यावी व त्याची पूर्वलक्ष प्रभावाने थकबाकी त्वरीत देण्यात यावी.
३) आशा व गटप्रवर्तकांचे कामावर आधारीत दर ५ ते ६ वर्षापूर्वी ठरविलेले आहे. त्यानंतर महागाई तिप्पटीने वाढलेली आहे. त्यामुळे मोबदलादरामध्ये तात्काळ महागाई निर्देशकाप्रमाणे दर वाढवून देण्यात यावेत. (४) आशा गटप्रवर्तकांना दरवर्षी दिवाळीपूर्वी १ महिण्याच्या मानधनाएवढा बोनस देण्यात यावा.
(५) आशा व गटप्रवर्तकांच्या तक्रारी व अडचणी सोडविण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण
समिती स्थापन करण्यात यावी.
६) २३ जुन २०२१ रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री तसेच राज्यस्तरीय अधिकारी यांच्याशी बैठकी ठरल्याप्रमाणे
आशा व गटप्रवर्तकांच्या सेवा शर्ती ठरविण्यात याव्यात.
७) केंद्र निधी (पिआयपी) आणि राज्य निधीमधुन आशा व गटप्रवर्तकांचा मोबदला दिला जातो. तो एकत्रित व दरमहा नियमीत ५ तारखेच्या आत देण्यात यावा.
८) काही आरोग्य वर्धनी केंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी नसल्यामुळे तसेच काही ठिकाणी सोडून गेल्यामुळे आशा वर्कर यांना वर्धनी मोबदला (इनसेटिव्ह) मिळत नाही तो तात्काळ देण्यात यावा...
९) आशा व गटप्रवर्तकांना १ महिण्याची आजारी रजा देण्यात यावी. तसेच प्रसुती रजा मंजुर करण्यात यावी. १०) केंद्र सरकारच्या घोषणेनुसार आशा व गटप्रवर्तकांना प्रधानमंत्री जिवनज्योती, सुरक्षा बिमा योजना लागु करण्यात
*गटप्रवर्तकांच्या मागण्या*:
(१) राष्ट्रीय आरोग्य अभियानातील गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचान्याप्रमाणे काम करावे लागते. तरीसुध्दा गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुसूत्रीकरणात गटप्रवर्तकांचा समावेश करण्यात आला नाही तो बैठकीत ठरल्याप्रमाणे
समावेश करण्यात यावा.
२) गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धीनीमध्ये समावेश केलेला नाही. परंतु आरोग्य वर्धीनी अंतर्गत आशांनी केलेल्या कामाचे रिपोर्टींग गटप्रवर्तकांना करायला सांगतात त्यामुळे गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धीनी कार्यक्रमात समावेश करून दरमहा १५०० रु. मोबदला देण्यात यावा.
३) गटप्रवर्तकांना डेटा एन्ट्री करिता ५० रु. प्रतिदिन याप्रमाणे एकुण ५ दिवसाकरिता प्रतिमहा २५० रु. सन २०२० ते २०२१ च्या पिआयपी मध्ये मंजुर केल्याचे २१ नोव्हेंबर २०२० च्या शासन परीपत्रकाव्दारे आदेशीत केले आहे. परंतु सदर मोबदला गटप्रवर्तकाला दिला जात नाही. आशा सॉप्टवेअर जरी बंद असला तरी रिपोर्टींग करण्याचे काम गटप्रवर्तक करतात. तेव्हा एप्रिल २०२० पासुन प्रतिमहा २५० रु. गटप्रवर्तकांना त्वरीत अदा करण्यात यावा. ४) गटप्रवर्तकांना २० दिवस दौरे करून ५ दिवस पीएचसीत अहवाल तयार करावा लागतो. त्यामुळे राज्यस्तरीय बैठकीत ठरल्याप्रमाणे दौरे करण्यासाठी स्कुटर देण्यात यावी. ५) गटप्रवर्तकांना ११ महिण्याचे नेमणुकीचे आदेश दिले जातात. तसे न करता गटप्रवर्तकांना कायम नेमणुकीचे लेखी आदेश देण्यात यावे
आंदोलनाचे नेतृत्व
या संपात आयटक कॉम्रेड नयन गायकवाड, कॉ. मायावती बोरकर, कॉ. सविता प्रधान, कॉ. छाया वारके
अशोक नगर
1)शोभा डोईफोडे
2)ज्योती गायकवाड
3)उषा बाविस्कर
4)संध्या गायकवाड
5)शालू ताई नाईक
6)राजकन्या इंगळे
7)मीनाक्षी भगत
8)किरण साळुंखे
9)वंदना शिरसाट
10)रेखा सरकटे
11)शिल्पा गायकवाड
12)पुनम खोब्रागडे
कुरनखेड
1) सुजाता सदाशिव
2) वंदना बंडारे
3) मंजू अविनाश वानबडे
4) अरुणा संतोष वाघमारे
5) सुष्मा संजय बासोळे
6) प्रभा अशोक ठाकरे
7) ज्योती दिपक वानखेडे
8) प्रिती प्र. बोळे
9) अलका संजय टेकाडे
10) वंदना हरिदास पांडे.
11) प्रजावती आदेश खंडारे
12) वंदना गजानन चक्रनारायन
13) ओवी गौतम पंडीत
14) शुद्धमती गणेश दामोदर
इत्यादीनी केले आहे.!
आपल्या प्रतिक्रिया द्या....